मुर्तीजापुर प्रतिनिधी
तालुक्यातील जांभा खुर्द ग्रामपंचायत मध्ये वीस वर्षानंतर सत्तारंत झाले असून यामध्ये एकता पॅनलचा 8-0 ने दणदणीत विजय झाला आहे जांभा खुर्द येथील नागरिकांनी गोरगरीब जनतेने मिळून जातपात धर्म विसरून व दडपशाहीला न जुमानता एकतेने एकता पॅनलच्या सर्वच सदस्यांना भरघोस मतांनी निवडून दिले यामध्ये तरुणांना संधी प्राप्त झाली प्रस्थापितांचे वीस वर्षापासूनचे वर्चस्व नागरिकांच्या विश्वासाला तडा गेल्याने मतदारांनी अक्षरशः धुडकावून लावले प्रतिस्पर्धी पॅनलचे सर्वेसर्वा असलेले राजू साहेबराव वानखडे यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला यामध्ये मार्गदर्शन करणारे प्राध्यापक दिलीप मधुकर मोरे अशोकराव मोरे माजी न्याय तहसीलदार विनोद मोरे यांनी उमेदवार कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले एकता पॅनल मध्ये सरपंच दीपक वानखडे सदस्य म्हणून गजानन मोरे सौ गोकुळा मोहोड रंजीत बावणे अमृता मोरे सीमा मोहोड सीमा मोरे विशाल मोहोड या सर्वांना 75 ते 80 टक्के मतं मिळाली प्रतिस्पर्धी पॅनलचा संपूर्ण धुवा उडविला एकता पॅनलला निवडून आणण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ता शिवाजी बावनेर यांचा मोलाचा वाटा त्याचबरोबर दिलीप वानखडे समाधान मोहोड गजानन मोरे दादाराव मोहोड ओंकार काळे सुरेश मोहोड गणेश राव गावंडे संजय इंगळे कैलास पेटकर अजबराव मोहोड तसेच बाबाराव मोहोड इत्यादींनी विजयासाठी परिश्रम करून एकता पॅनलला विजय मिळवण्यासाठी सहकार्य केले आहे गावात नवीन चेहऱ्यांना तरुणांना संधी मिळालेल्या आनंद उसाचे वातावरण दिसून येत आहे
Users Today : 32