कुरुम येथे बाप्पाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप

Khozmaster
1 Min Read

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमली प्रतिनिधी विशाल गवई अकोला 

मुर्तिजापुर तालुक्यातील ग्राम कुरुम येथील सार्वजनिक गणेशोत्सव सर्वत्र प्रसिद्ध असून अकराव्या दिवसानंतर गणेश विसर्जन सोहळा १० सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात आनंदोत्सवात हर्षित संपन्न झाला.     यावर्षी कुरुम येथे ७ सार्वजनिक गणेश मंडळाची गणेशभक्तांकडून स्थापना करण्यात आली होती . यामध्ये संत केशवभारती संस्थानाच्या मानाचा गणपती पासून सुरवात झाली . यावेळी भाजपचे सर्कल प्रमुख संतोष शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या कार्यकर्त्याकडून चहा , पोहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती .    विसर्जन मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये म्हणून अकोला गृह पोलीस उपधीक्षक नितीन शिंदे , मानाचे ठाणेदार कैलाश भगत , पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांनी विविध ठिकाणी चोख बंदोबस्त लावला होता .                                             गणेशोत्सव तथा विसर्जन सोहळा साजरा होण्यासाठी राव राठोड तेली समाज संघटना जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे कुरुम सर्कल प्रमुख संतोष शिरभाते , सरपंच अतुल वाठ , अकोला जिल्हा भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख , वितरणचे शाखा अभियंता चेतन ढमके , मंडळ अधिकारी सदानंद देशपांडे , पटवारी दर्शन चव्हाण ग्रामविकास अधिकारी दिपक आदीसह सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते , गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते .

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *