एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

Khozmaster
3 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये शैक्षणिक वर्ष सन 2023-2024 प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता विद्यार्थ्यांकडून 10 फेब्रुवारी, 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमाती, आदिम जमातीचा किंवा डीएनटी, एन.टी. एस.एन.टी असावा. तर इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील रिक्त अनुशेष भरण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती, आदिम जमातीचा असणे बंधनकारक राहील. प्रवेशासाठी  पालकांचे वार्षिक उत्पन्न सरासरी 6 लाखापेक्षा कमी असावे. अर्जासोबत जन्म दाखला, बोनाफाईड सर्टीफिकेट व इतर आवश्यक सर्व कागदपत्राची सांक्षाकित प्रती जोडणे आवश्यक असेल. शासकीय, निमशासकीय सेवतील कर्मचाऱ्यांच्या पालकांच्या पाल्यांना अर्ज करता येणार नाही. प्रवेशासाठी रविवार 26 फेब्रुवारी, 2023 रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येईल.प्वेश पूर्व स्पर्धा परिक्षेकरीता शासकीय,अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमाती व आदिम जमातीचे किंवा डीएनटी, एनटी, एसएनटी विद्यार्थी पात्र राहतील.  सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते आठवी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता अनुक्रमे इयत्ता सहावी  ते नववी प्रवेशास पात्र राहतील. प्रत्येक एकलव्य स्कुलमध्ये इयत्ता सहावी करीता 30 मुले व 30 मुली अशी प्रवेश क्षमता राहील.
सन 2023-24 मध्ये इयत्ता सातवी ते नववी करीता ज्या एकलव्य शाळांमध्ये विद्यार्थी अनुशेष असेल त्याच जागा भरण्यात येतील. विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार प्रवेश देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रात प्रवेश पाहिजे असलेल्या एकलव्य शाळांबाबत पाच पसंतीक्रम द्यावेत. परीक्षेकरीता शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणारा विद्यार्थी इयत्ता सहावी करिता अर्ज करु शकतो.त्याचप्रमाणे इयत्ता सहावी मध्ये शिकणारा विद्यार्थी इयत्ता सातवीसाठी, इयत्ता आठवी करिता शिकणारा विद्यार्थी हा इयत्ता नववी करीता अर्ज करु शकतो. अर्ज करतेवेळी अचुक इयत्ता नोंदविणे आवश्यक राहील. प्रवेश अर्जामध्ये नमूद प्रमाणपत्रावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी, शिक्का, नाव असणे अनिवार्य आहे.अन्यथा अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय नंदुरबार, एकलव्य मॉडेल स्कुल, नंदुरबार, एकलव्य मॉडेल स्कुल, ढोंगसागळी व एकलव्य मॉडेल स्कुल, मोहिदा (सूलतानपूर ) येथे उपलब्ध करुन देण्यात आले असून परिपूर्ण अर्ज भरुन 10 फेब्रुवारी,2023 पर्यंत तेथेच  स्विकारण्यात येतील यांची नोंद घ्यावी. असे आवाहन  प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *