ग्राम निंबा येथे काँग्रेस स्थापना दिवस संपन्न…

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी :- लुकमान शहा निंबा बाळापूर
काँग्रेस स्थापना दिवस निमित्य ग्राम निंबा येथे भव्य नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न…
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 138 वा स्थापना दिवस निमित्त बाळापुर तालुक्यातील निंबा गाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस साजरा करण्यात आला.नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा शिबिरही या स्थापना दिवसा निमित्ताने आयोजित करण्यात आले होते काँग्रेस स्थापना देशात स्वातंत्र लढ्यातील काँग्रेसचे योगदान स्वातंत्र भारतात काँग्रेसचे योगदान या विविध विषयावर बोलत प्रकाश तायडे यांनी काँग्रेस विचारधारेचे आपण जूडावे असे आवाहन उपस्थित नागरिकांना त्यांना केले दीपक पोहरे यांनी काँग्रेस शिवाय पर्याय नाही महागाई बेरोजगारी याला उत्तर म्हणजे फक्त काँग्रेस आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत असे सांगितले. डॉ.प्रदीप अंभोरे नेत्रतज्ञ त्यांचे सहाय्यक राजूभाऊ यांनी 500 पेक्षा जास्त रुग्णांची नेत्र तपासणी केली यांना मोफत चष्मे वाटप प्रकाश भाऊ तायडे यांच्याकडून करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश भाऊ तायडे सूत्रसंचालन वसीम शेख अनुमोदन सुरेशभाऊ बाबूले, प्रस्ताविक नानासाहेब तायडे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव, दीपक पोहरे, ता.अध्यक्ष बाळापुर काँग्रेस कमिटी,नेत्र तज्ञ डॉ. प्रदीप अंभोरे, जीवनराव देशमुख संजय उन्हाळे रफिक शेख शकील शहा निसार शहा नितीन देशमुख, सुरेश चोपडे, सरपंच पती बंडू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य रफिक भाई इत्यादी प्रमुख उपस्थितीत होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष थोटे सुरेश बाबुळे नितीन देशमुख त्यांनी आता परिश्रम केले.
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *