तेल्हारा येथे सकल कुणबी समाज मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन,, जगद्गुरु  प्रबोधन मंडळाचा पुढाकार

Khozmaster
2 Min Read
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी तेल्हारा
जगद्गुरु प्रबोधन मंडळ तेल्हारा तालुक्याच्या वतीने  नववर्षाच्या पहिल्या दिनी म्हणजे रविवार दि.१ जानेवारी २०२३ रोजी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे सकाळी  ११.०० वा.अकोला जिल्ह्यातील कुणबी समाजाचे जिल्हा परिषद सदस्य, नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती, तेल्हारा तालुक्यातील पंचायत समिती सदस्य तसेच सरपंचाच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले असून सकल कुणबी समाज मेळावा आयोजित केला आहे.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्यास आश्रम चांगेफळ बु.चे महंत स्वामी श्री रामभारतीजी महाराज राहणार असून उद्घाटक म्हणून ज्येष्ठ  मार्गदर्शक डॉ. भास्करराव मुळे असणार आहेत तर माजी आमदार  नारायणराव गव्हाणकर, आमदार डॉ. संजय कुटे,आमदार  राजेश  एकडे व आमदार आकाशदादा फुंडकर विशेष अतिथी असून  प्रभाकरराव मानकर,प्रकाश बोर्डे,चंद्रशेखर पांडे गुरुजी,प्रदिप वानखडे, डॉ.बाबुराव शेळके,रामेश दुतोंडे,कैलास गोंडचवर, शिवाभाऊ गोंड,श्रीकृष्ण गोडबोले,सौ.संध्याताई वाघोडे,सौ.शोभाताई शेळके,सौ.देवश्रीताई ठाकरे ह्या प्रमुख उपस्थिती म्हणून आमंत्रित आहेत.या सत्कार सोहळ्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष  सुनील फाटकर व सदस्य  अनंतराव अवचार,गोपाल दातकर,गजानन काकड,प्रकाश आतकड,राम गव्हाणकर, सौ.प्रगतीताई दांदळे, सौ.सुलभाताई दुतोंडे,सौ.मिनाक्षीताई उन्हाळे,अकोट पंचायत समिती सभापती सौ.हरिदिनीताई वाघोडे,उपसभापती  संतोष शिवरकार, तेल्हारा पंचायत समिती सदस्य अरविंद तिव्हाणे,सौ.जयश्रीताई घंगाळ सौ.जयश्रीताई लांडे व तेल्हारा तालुक्यातील सरपंच देवानंद नागले, नवलकुमार अरबट, नंदलाल भराटे, सौ.शिलाताई वाकोडे, विठ्ठल तायडे, वसंतराव पाथरीकर या स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांना सन्मानित केल्या जाणार आहे.मेळाव्यात सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांना जगदगुरु शब्दरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाणार आहे व त्यांच्या कवितांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.तरी या सकल कुणबी समाज मेळाव्याला समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हाराचे अध्यक्ष महेंद्र कराळे,उपाध्यक्ष रामभाऊ फाटकर,सुदेश शेळके ,सचिव राजेश बुरघाटे व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
0 9 4 7 4 3
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *