अभिनेत्री कल्पना भावसार यांनी अल्पवधीत काळात सिनेसृष्टी मध्ये आपला ठसा उमटवला

Khozmaster
3 Min Read

शुभम ढवळे भावसार

 पुणे येथील सिने अभिनेत्री कल्पना भावसार यांनी अल्पविधीत काळात सिनेसृष्टीत आपल्या नावाचा ठसा उमटवला व सिनेसृष्टी मध्ये दखल घ्यायला लावली गेली.दहा वर्ष त्या मराठी , हिंदी चित्रपट, नाटक अशा सिनेसृष्टीत संघर्षमय प्रवास करीत होत्या सुरुवातीपासून त्यांना खूप अडचणी आल्या परंतु त्यांनी हार मानली नाही कोणाचाही पाठिंबा नसताना त्यांनी सिनेसृष्टी मध्ये आपले करिअर करण्याची मनाशी पक्के ठरवले व फिल्म इंडस्ट्रीमध्ये
त्यांनी आपले पाऊल ठेवले यामध्ये त्यांच्या पाठीशी कोणताच गॉडफादर नव्हता,साधी ओळख ही नव्हती पण आपल्या जिद्दीच्या जोरावर अभिनेत्री कल्पना भावसार यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये धुमधडाक्यात आगमन केले व यश ही मिळवले हे यश सहजा सहज मिळाले नाही यासाठी खुप मोठा संघर्ष त्याग त्यांना करावा लागला, त्यांनी मराठी चित्रपट दणक्यावर दणका, मला एक चानस हवा ,मॅरेथॉन जिंदगी, अंतरवेली, इपितर ,सासरची साडी ,बुधवार पेठ ,आमचं लग्न होईल का? येडू आईच्या नावानं चांगभलं , बनौ मा की महिमा ,विनाकारण राजकारण,उसाण ,वर्तमान , अशा विविध मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका रंगवल्या त्यासह मराठी मालिके मध्येही त्यांनी छोटे मोठे रोल करण्यास प्रारंभ केला त्यामध्ये “ज्ञानेश्वर माऊली दूर्वा ,संघर्ष ,आम्ही कारभारीन आणि संघर्ष मिलनाचा या मराठी टीव्ही सिरीयल मध्ये आपली अभिनयाची चमक दाखवली . हिंदी चित्रपट परफेक्ट प्लॅन डॉन चाची चा भूमिका खूप छान साकारले, रॉबिन हुडके पोते या हिंदी चित्रपटांमध्ये ही त्यांना भूमिका करण्याची संधी प्राप्त झाली तसेच शहरांमध्ये होणारे महानाट्य मध्येही त्यांनी आपला सहभाग नोंदवला शंभुराजे, साई दरबार यात बायजाबाई चा रोल निभावाला ,शिवराज्याभिषेक अशा महानाट्य मधून त्यांनी मायबाप प्रेक्षकांची वहा वहा मिळवली पुढे त्यांना त्यांच्या कामाची व भूमिकेची दखल घेऊन महाराष्ट्रातून कलारत्न पुरस्कार ,अहिल्याबाई होळकर पुरस्कार आणि आता कला हिरकणी 30 Dec2022 मानाचा तुरा या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जाणार आहे, गेल्या दहा वर्षापासून त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे प्रमुख्याने त्यांना आई साहेब ,सासूबाई , अक्का अक्काबाई, अशा अनेक भूमिकेसाठी त्यांना विचारले जात आहे व जास्त मागणी होत आहे कुठल्याही रोल मध्ये परफेक्ट भूमिका करतात , मराठी चित्रपट समाज प्रबोधन व संदेश देणारे,कौटुंबिक भूमिका करण्यास ते प्राधान्य देतात ,आजपर्यंत त्यांनी अनेक चित्रपट ,मालिकेतून आपला अभिनयचा ठसा उमटवला आहे ,कोणतीही हार न पत्करता त्यांनी जोमाने अभिनय क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी पक्की जिद्द ठेवून त्या आल्या होत्या त्यांनी पाहिलं व जिंकलं असेच म्हणावे लागेल, त्यांना पुढील सिनेसृष्टीत कारकीर्द साठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद.
संकलन – शुभम ढवळे भावसार
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भावसार एकता फाउंडेशन
0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *