वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखम.

KHOZ MASTER
1 Min Read
image description
प्रतिनिधी प्रविण चव्हाण
नंदुरबार
नवापूर तालुक्यातील बोरपाडा गावाच्या धरणा जवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील भोमदीपाडा येथील विपुल गोबजी गावित हे दुचाकीने (क्र. एम. एच. ३९ के ६२१८) जात होते. यावेळी एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.०७ एबी ७६७७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालकवून बोरपाडा गावाच्या जवळील वळणावर दुचाकी धडक दिल्याने विपुल गावित यांना दुखापत झाली.तसेच दुचाकीचेही नुकसान झाले असून अपघाता नंतर वाहन चालक घटना स्थळा वरून पसार झाला.याबाबत दिलाबाई गोबजी गावित यांच्या
फिर्यादी वरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात वाहन चालका विरोधात भादंवि कलम २७९,३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहे हिंदुस्थान नाईक करीत आहेत.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *