मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ता पुर्ण होत आहे.
प्रदीप कोलटक्के
अकोला– अकोट तालुक्यातील ग्राम गरसोळी 283 लोकसंखेच गाव असून गट ग्राम पंचायत पातोंडा – गरसोळी आहे. गरसोळी ते पातोंडा रस्त्याचा वनवा थांबला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गरसोळी पातोंडा रस्ता होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना जो त्रास पावसाळ्यात होत होता त्याला आता कुठेतरी पुर्ण विराम लागला आहे. गावामध्ये रस्ता जर असला तर, कोणताही त्रास होत नाही. आरोग्य, शिक्षण, पाणी हे ग्रामीण भागातील, साधन असुन आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी रस्ता करण्या संदर्भात पारदर्शकता दाखवली नाही. गरसोळी या गावाची मुख्य बाजारपेठ हि चोहोट्टा बाजार असुन गरसोळी येथुन १२ किलोमिटर अंतरावर बाजार समिती आहे. गरसोळी पातोंडा रस्ता हा फक्त उन्हाळ्यातच या रस्त्याने वाहने जात असत. पावसाळा, आणि हिवाळा या रस्त्याने कोणतेही थ्री व्हिलर किंवा अवजड वाहन जात नसे. शेतकऱ्यांचा माल घेऊन जाणे म्हणजे कुटासा कावसा मार्गे २५ किलोमिटर फे-याने जाव लागत होत. आता कुठेतरी रस्त्या संदर्भातील मार्ग मोकळा झाला आहे. आणि गट ग्राम पंचायत पातोंडा गरसोळी हे गाव विकासाच्या दृष्टीने कोसो दूर आहे. 75 वर्ष प्रतिक्षेनंतर रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे गावातील नागरिकांच दुर्दैव आहे. पातोंडा गरसोळी या गावातील संपूर्ण व्यवहार बॅक खाते तलाठी कार्यालय कुटासा असुन दहिहांडा हे आठवडी बाजाराच मुख्य ठिकाण आहे. सर्व सामान्य नागरिकांचा ग्रामीण भागातील विकास कामांची कोणत्याही प्रकारची दखल शासन व सरकारने घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिक्रिया –
गरसोळी आणि पातोंडा या दोन्ही गावाचा कायापालट करण्यासाठी सर्वप्रथम रस्ता महत्वाचा आहे तो आता पुर्ण होत आहे. रस्त्यामुळे नविन संधी चालून येतील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पावसाळ्यात जो त्रास सहन करावा लागत होता त्याला कुठे तरी पुर्ण विराम लागले.
तुषार शिरसाट युवा अध्यक्ष कोळी महासंघ अकोला
आतापर्यंत वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत होता त्याने दवाखान्यात पेशंट नेण्यासाठी किंवा, एखादा डिलीव्हरी पेशंट नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा रस्ता होता तो दुष्काळ संपल्या सारखे वाटत.
प्रमोद टाकसाळे वाहन धारक पातोंडा
रस्त्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच एस टी बस सेवा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी लवकर निवेदन देऊ. जेणेकरून गरसोळी पातोंडा येथिल विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या करीता एक बस सेवा अकोल्यावरून सुरू व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
*नंदु घावट सामाजिक कार्यकर्ता पातोंडा*
Users Today : 30