प्रतिनिधी:-गोकुळसिंग राजपूत
सिल्लोड तालुक्यातील गणेशोत्सवा निमित्ताने आसडी येथे आर्य नवयुवक गणेश मंडळाने सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव आदर्शवत पद्धतीने साजरा केला.या वर्षी चे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची मुलुख मैदानी बुलंद तोफ, शिवशंभूव्याख्याते प्रदीप जगताप पाटील.यांचा व्याख्यानाचे आयोजन ठरले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली,यावेळी आपल्या दिमाखदार शैलीत उपस्थिताना शिवचरित्र ऐकवत असताना प्रत्येक श्रोत्याला आपण जणू काही इतिहासातच जगतोय की काय असा भास झाला शिवाय राहत नाही.पुढे बोलत असताना शिवव्याख्याते प्रदीप जगताप यांनी जीवनात मित्राचे महत्व पटाऊन सांगितले, दहा नालायक लोक आयुष्यात असल्या पेक्षा एक लायक मित्र आयुष्य असावा, अश्या मार्मिक शब्दात प्रदीप जगताप यांनी काळजाचा ठाव घेणारे प्रबोधन केले.व्याख्यानाच्याच सुरवातीला अचानक वरून राज्याने हजेरी लावली मात्र चालू पावसातही श्रोत्यांनी व्याखानाला भरभरून प्रतिसाद दिला,छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांचे विचार जणू काही प्रत्येकाच्या काळजावर कोरून काढण्याचे काम व्याख्याते प्रदीप जगताप यांनी केले,महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवत कथाकार, हभप श्री अजबराव महाराज मिरगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सम्पन्न झाला.यावेळी गावचे पोलिस पाटील रंगनाथ मेटे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सांडु पाटील सुरडकर उप सरपंच आंबादास तुपे .कवि चंद्र भारती.आर्य नवयुवक गणेश मंडळ आसडी अध्यक्ष भागवत दादाराव मिरगे,उपाध्यक्ष आण्णा कडुबा कर्पे ,सदस्य कपिल तुपे कृष्णा कर्पे,संजय कर्पे,समाधान मिरगे,डॉ देवरे.पंढरी तुपे,कृष्णा तुपे आप्पा पंडीत आमोल मिरगे गोपाल तुपे आप्पा पाटील मिरगे पिराजि कर्पे ज्ञानेश्वर तुपे गणेश मिरगे भगवान तुपे गजानन पंडीत विनोद मिरगे विशाल मिरगे विठ्ठल कर्पे मोहन कर्पे,काकासाहेब कर्पे यांच्या सह हजारी ग्रामस्थांची उपस्थिती होती
Users Today : 11