विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकांचा आदर्श घ्यावे,जगाला नवीन वैज्ञानिक मिळतील- गजानन परांडे

Khozmaster
2 Min Read
सैय्यद इमरान शिक्षणिक बातमी
मालेगांव 
शासन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवत असते त्यामधला तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभाग स्तरीय ज्ञान प्रदर्शन हा एक भाग आहे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रेरणा दिल्यास आणि मार्गदर्शन केल्यास या जगाला नवीन वैज्ञानिक मिळतील आणि अजून प्रगती होईल असे प्रतिपादन मालेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन परांडे यांनी केले ते मालेगाव येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वाटप करताना बोलत होते.
       मालेगाव येथे नाना मुंदडा विद्यालय आत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालेगाव पंचायत समितीच्या सभापती सौ रंजना काळे या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे संचालक रामबाबूजी मुंदडा , गटशिक्षणाधिकारी गजानन परांडे विज्ञान शिक्षक प्रा संतोष गीऱ्हे मुख्याध्यापक सुनील राठी हे होते त्यावेळी उद्घाटन झाल्यावर सर्व मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनी चे पाहणी केली आणि परीक्षकांनी परीक्षण केले त्यानंतर संध्याकाळी चार वाजता बक्षीस व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले वर्ग सहा ते आठ मधून प्रथम क्रमांक अरिहंत विद्यामंदिर शिरपूर येथील गीता देशमुख हिचा तर द्वितीय क्रमांक मुंदडा विद्यालयाच्या फाल्गुनी वर्मा हिचा व तृतीय क्रमांक स्वामी समर्थ विद्यामंदिर येथील विनायक बळी यांचा तर चतुर्थ क्रमांक श्रीमती ल जी घुगे पांगरा बंदी येथील समृद्धी बुद्धिवंत हिचा तर पाचवा क्रमांक बाल विकास मंदिर येथील स्वामी भुजाडे यांचा आलेला आहे. वर्ग नऊ ते बारा मधून प्रथम क्रमांक मुंदडा विद्यालय येथील मयूर घोडे याचा तर द्वितीय क्रमांक सुमनबाई विद्यालय मारसुळ येथील पल्लवी घोडेकर हिचा तर तृतीय क्रमांक ढवळे विद्यालय शिरपूर येथील श्रद्धा वाघ हिचा तर चतुर्थ क्रमांक मुंदडा विद्यालयातील नेहा चव्हाण यांचा तर पाचवा क्रमांक स्वामी समर्थ विद्यामंदिर येथील प्रथमेश देशमुख हिचा आलेला आहे. प्रावीण्य प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला लवकरच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्या वेळी देण्यात आली. संचलन अंभोरे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल कल्याणकर यांनी केले.
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *