23 नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात रुजु..

Khozmaster
2 Min Read

 

प्रविण चव्हाण

नंदुरबार -: सन-2019 या वर्षासाठी नोव्हेंबर, डिसेंबर-2021 मध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दला मार्फत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी, लेखी परिक्षा व वैद्यकीय तपासणी मध्ये उत्तीर्ण झालेले 14 पुरुष व 09 महिला उमेदवार असे एकुण 23 उमेदवार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने भरती झालेले आहेत.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने भरती झालेले 14 पुरुष उमेदवारांना दिनांक 29 मार्च 2022 रोजी शारीरिक व कायद्याच्या प्रशिक्षण घेण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे तर महिला उमेदवारांना पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, सांगली येथे पाठविण्यात आले होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले पोलीस अंमलदार दिनांक 29 डिसेंबर रोजी पुन्हा नंदुरबार जिल्हा पोलीस दलात हजर झाले आहेत.

पोलीस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन आलेल्या पुरुष व महिला अंमलदारांची नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी भेट घेवून त्यांना आपले दैनंदिन कर्तव्य बजावित असतांना सर्व सामान्य जनतेचे लक्ष पोलीसांकडे असते, पोलीसाची प्रत्येक कृती ही समाजावर परिणामकारक असते त्यामुळे जनते मध्ये काम करीत असतांना पोलीसांची वर्तवणूक नेहमी आदर्श व शिस्तप्रिय असावी. पोलीस दलात काम करीत असतांना नहेमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच दैनंदिन कर्तव्य पार पाडून स्वत:च्या आरोग्याकडे देखील तेवढेच लक्ष द्यावे. नंदुरबार जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रत्येक पोलीस अंमलदाराने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. प्रशिक्षण घेवून आलेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस दलातील त्यांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, राखीव पोलीस निरीक्षक देवनाथसिंग राजपुत हे उपस्थित होते.

0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *