शहरातील चौकांत पुर्णवेळ वाहतूक नियंत्रक यंत्रणा राबवा पातूर तालुका विकास मंच -शिवकुमार बायस

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर शहरातील नवीन बसस्थानक जवळ महाराणा प्रतापसिंह चौकात तसेच जुने बसस्थानक शाहबाबू चौकात महामार्गावर नामांकित महाविद्यालये आहेत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चौकात बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांमुळे रस्ता ओलांडून जाण्या-येण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.आपला जीव मुठीत घेऊन येथील विद्यार्थी व येथून ये-जा करणारे नागरिक रस्ता ओलांडताना कसरत करत आहेत.महाविद्यालय सुरू आणी सुटण्याच्या वेळात अनेक टवाळखोर रोड रोमिओ मुलांची येथे गर्दी दिसून येते.अशा रोड रोमिओ व बेशिस्तपणे आपले वाहन रोडवरच पार्किंग करणा-यांवर दंडात्मक योग्य कारवाईची गरज आहे यासाठी पातूर तालुका विकास मंचाच्या वतीने संबंधित वाहतूक नियंत्रक विभागाला निवेदनाद्वारे सुचना करण्यात आली.शहरात बेशिस्तपणे कुठेही दूचाकी व चारचाकी वाहने उभी राहू देवू नये जेणेकरून शाळकरी विद्यार्थ्यांना व इतरांना याचा त्रास होणार नाही.

निवेदनातील मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी व कार्यवाही न झाल्यास दरम्यान एखादी दुर्दैवी घटना घडून कुणाचा मृत्यू झाल्यास याला पुर्णपणे प्रशासन जबाबदार राहील अशाप्रकारचे लेखी निवेदन एका पत्राद्वारे तहसील कार्यालया मार्फत पोलीस अधीक्षक अकोला यांना देण्यात आले.यावर संबंधित वाहतूक नियंत्रक विभागाकडून कशी अंमलबजावणी होईल हे बघने औत्सुक्याचे ठरेल.

निवेदन देतांना पातूर तालुका विकास मंचाचे पदाधिकारी किरणकुमार निमकंडे,प्रल्हाद गवई,मधूकर राखोंडे,विजय राऊत,रूस्तम गवई, रामेश्वर वाडी,डॉ.विलास हिरळकार,विनोद तेजवाल,रणजीत गाडेकर,विठ्ठल डिके,साजीद सर,प्रमोद श्रीनाथ व इतर मान्यवर उपस्थित होते.

0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *