मळसुर
सस्ती व चान्नी वीज उपकेंद्र अंतर्गत २७ गावांपैकी बहुतांश गावात ४ जानेवारी रोजी सकाळपासूनच विद्युतपुरवठा खंडित झाला होता. काही गावात विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी सस्ती वीज उपकेंद्राला कुलूप असल्याचे आढळून आले तसेच चान्नी वीज उपकेंद्रात शुकशुकाट असून सुरक्षारक्षक, एक ऑपरेटर असे दोन कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. काही गावात विद्युत पुरवठ्यामध्ये बिघाड आल्याने संपात सहभागी लाईनमन यांच्याकडून विद्युत
हावितरण पुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करण्यास नकार देण्यात आला. काही गावात खासगी लाईनमन यांनी सुद्धा महावितरणच्या संपामध्ये सहभाग घेतला. त्यांनीही विद्युत पुरवठ्यामध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यास नकार दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत अनेक गावात विद्युत पुरवठा खंडित असल्याचे चित्र होते. त्यामुळे बँक, शाळा व इतर कार्यालयातील ऑनलाइनची कामे खोळंबल्याचे दिसून आले.
Users Today : 29