संस्थेची प्रगती करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्याची गरज – प्राचार्य सुनील राठी

Khozmaster
2 Min Read
सैय्यद इमरान मालेगांव 
च्या संस्थेत आपण काम करतो त्या संस्थेत आपण प्रामाणिकपणे काम करावे शाळेची व संस्थेची प्रगती करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे शिक्षक तसेच मुख्याध्यापक असताना मला शाळेच्या सर्व घटकांकडून खूप सहकार्य मिळाले असे सहकार्य एकमेकांसोबत सुद्धा ठेवून सर्व मुख्याध्यापकांना सहकार्य करा व शाळेचे नाव लौकिक करा असे प्रतिपादन मुंदडा विद्यालयातील सेवानिवृत्त प्राचार्य सुनील राठी यांनी केले ते त्यांच्या निरोप समारंभामध्ये सत्काराला उत्तर देताना बोलत होते.शहरातील नाना मुंदडा विद्यालयाचे प्राचार्य सुनील राठी यांच्या नियत वयोमानानुसार 31 डिसेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त झाले आहे त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल मुंदडा विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच नाना मुंदडा विद्यालय पगारदार सेवकांची पतसंस्था यांच्यामार्फत त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिल काळे हे होते तर प्रमुख उपस्थिती सत्कार मूर्ती म्हणून सेवानिवृत्त होत असलेले प्राचार्य सुनील राठी तसेच प्रयोगशाळा सहाय्यक विष्णू शर्मा प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य दिनेश उंटवाल उपमुख्याध्यापक डॉ पनपालिया पर्यवेक्षिका उंबरकर मॅडम पर्यवेक्षक दिनकर गुडदे वरिष्ठ लिपिक अविनाश पसारकर नारायण झळके संदीप सावले हे होते. त्यावेळी पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त होत असलेल्या दोघांचाही शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी दिनेश उंटवाल, सिद्धार्थ भालेराव ,अमोल कल्याणकर, श्रीराम रोडे, देवानंद ताजने, नारायण झळके यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन संजय साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंभोरे सर यांनी केले.
0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *