प्रतिनिधी:-शिवाजी उदार दिनांक,13-9-2022
मेरा खुर्द:- अंत्री खेडेकर येथील गावकऱ्यांना त्रस्त करवून सोडणाऱ्या वानरांच्या मर्कट चाळ्यांपासून वन्यप्राणी मित्र समाधान गिरी यांनी केवळ मक्याची लालूच दाखवून शेकडो माकडांच्या टोळ्यांना पिंजराबंद केले. ११ सप्टेंबर रोजी सकाळीच ही मोहीम फत्ते करण्यात आली.विद्यार्थी, शिक्षक व गावातील प्रत्येकाला माकडांनीभंडावून सोडले होते. अखेर लोकवर्गणी करून सिल्लोडच्या वन्यप्राणी मित्रांना बोलावण्यातआले.अंत्री खेडेकर प्राथमिक आरोगय केंद्राच्या आवारात जुनी मोठमोठी चिंचेची झाडे आहेत. या झाडावर गेल्या काही महिन्यांपासून शेकडो वानरांचा रात्रदिवस मुक्काम असायचा. दररोज सकाळपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत माकडे धुमाकूळ घालत होते. दवाखान्याच्या इमारतीवर,शाळेच्या टीनपत्र्यांवर उड्या मारत मोठमोठ्याने आवाज करणे, दुपारच्या वेळेत विद्यार्थी खिचडी खात असताना त्यांच्याअंगावर धावून जात हातातील ताट हिसकावणे, चापटा मारून जखमी करणे, घरांवर उड्या मारणे,मालाची नासधुस करणे, दुचाकी-चारचाकी गाड्यांवर उड्या मारणे, महिला पाण्यासाठी घराबाहेर पडल्यास त्यांच्या डोक्यावरील हंडे पाडणे, महिलांना जखमी करणे असा या माकडांचा गावात उपद्रव वाढला होता. शिक्षक व ग्रामस्थांनी त्रासापायी बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. परंतु त्यांनीआतापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.अखेर त्रस्त झालेल्या शिक्षक व ग्रामस्थांनी वानरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी सिल्लोड येथील वन्यप्राणी मित्र समाधान गिरी यांना पाचारण केले. त्यांनी अंत्रीत पोहोचून सकाळी पाच वाजता चिंचेच्या झाडाखाली मक्याची कणसे टाकली. कणसे पाहून तोंडाला पाणी सुटलेल्या माकडांनी झाडांवरून थेट पिंजरागाठला आणि वन्यप्राणी मित्रांनी लावलेल्या सापळ्यात ते अडकले.पिंजऱ्यात जेरबंद झालेली शेकडो वानरे४०७ वाहनात घेऊन बोथा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरुप नेऊन सोडण्यात आली.