विकासकामात  पञकाराचे सहकार्य अपेक्षीत आ.प्रकाश भारसाकळे

Khozmaster
2 Min Read
पञकार दिनाच्या पुर्व सध्येंला मूख्य ओमशांती शाखेत पञकाराचा सत्कार
रितेश कुमार टीलावत तेल्हारा न्युज
1990 ला मि पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा माझा पहिला सत्कार ओमशांती अमरावती शाखेत झाला होता हा देश तरुण युवक, युवतींचा असून त्यांच्यात चांगले संस्कार धार्मिक प्रवृत्ती राष्टप्रेम असले पाहिजे हिवरखेड गावाचे शहरीकरण होत असून या गावाच्या  विकासासाठी, विकास निधी कमी पडू देणार नाही पण विकास कामे करीत असताना पत्रकारांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले.
ते  आज रोजी ओमशांती मुख्य शाखा  येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अनिल कराळे हे होते तर व्यासपिठावर जि.प. सदस्या सुलभाताई दुतोंडे, सरपंच वैशालीताई वानखडे, उपसरपंच रमेश दुतोंडे, जेष्ठ पत्रकार शामशील भोपळे अकोट चे उद्योजक संतोष शेंडे गजानन कराळे नंदुभाऊ तिडके यांची उपस्थिती होती. राज्यस्तरीय पत्रकारांचा  महाराष्ट प्रेरणा पुरस्कार मिळाल्या बद्दल किरण सेदानी यांचा आमदार प्रकाश भारसाकळे, रश्मीदीदी मामनकार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह पुश्पगूच्छ पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार दिनाचे औचीत्य साधून ,जेष्ट पञकार गणेश अग्रवाल, बाळासाहेब नेरकर,प्रा संतोष राऊत शामशील भोपळे, संदीप इंगळे, रमेश दुतोंडे, मनीष भूडके, केशव कोरडे, राजेश अस्वार, गोवर्धन गावंडे, संजय मानके जितेश कारीया यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन हभप अनंता रेखाते विलास झगडे अनिल राऊत, महादेव राऊत, मोहन मानसेता, गजानन येउल, लक्ष्मण हिवराळे, देविदास फोपसे, मनोहर दुतोंडे श्रीमती सावदे सौ तारापुरे श्रीमती ईलरकर सौ राधिका दूतोडे प्रवीन धूळ, मोरेदादा,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारातून पत्रकारांना चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळावी गत ४० वर्षापासून प्रेस क्लब पत्रकारांचे ओमशांती शाखेला सहकार्य असल्याचे यावेळी प्रास्ताविकातून  संचालीका रश्मीदीदी यांनी सांगितले स्वागत गीत ऋतुका बाभुळकर, बहारदार संचालन बाळासाहेब नेरकर तर आभार किरण सेदानी यांनी मानले  कार्यक्रमानंतर ओमशांती शाखेकडुन सर्वासाठी ब्रम्ह भोजनाची व्यवस्था केली होती तर कार्यक्रमाला माजी सरपंच प्रतीभा येऊल सीमा राऊत, कोमल सेदानी, सौ ऊज्वलाअमोल नेरकर रवींद्र माधानी, ठाणेदार विजय चव्हाण   नेवारे मेजर अंकुश हिवराळे, महेंद्र बुद्धदेव, यांच्या सह ओमशांती परीवार व महिला युवक  ग्रामस्थांची उपस्थिती होती.
0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *