प्रतिनिधी स्वप्नील गणगणे मुर्तीजापुर येथे आयोजित ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल पत्रकार मीत्र राष्ट्रीय संघटनेच्या वतीने श्री गाडगे महाराज विद्यालय सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन म्हणून साजरा करीत असताना व्यासपीठावर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे वतीने आयोजित केल्या गेलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थित उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते-पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून सांगितले की , आद्य समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचा उपयोग समाज प्रबोधनासाठी व समाजाच्या परिवर्तनासाठी केला आहे. त्याच पद्धतीने मूर्तिजापूरच्या जडणघडणीत सर्व पत्रकार बांधवांचा सिंहाचा वाटा आहे. कारण आम्ही प्रशासनात काम करताना आमच्या कार्याला प्रसिध्दी देण्याचे कार्य पत्रकार बांधव करतात covid-19 च्या कार्यात सर्वात जास्त जनतेला जागृत करण्याचे कार्य पत्रकार बांधवांनी केले असे भावोद्गार काढले. पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे पत्रकारिता हा समाज सेवेचा वसा व समाजाचे हित जोपासणे त्यासाठी आपली लेखणी वापरणे गरजेचे आहे . समाजात दोन प्रवृत्ती असतात एक चांगली प्रवृत्ती आणि दुसरी वाईट प्रवृत्ती, चांगल्या गोष्टीचा स्वीकार व वाईट प्रवृत्तीचा त्याग करणे हे पत्रकारांनी समजून घेतले पाहिजे असे प्रमुख पाहुणे म्हणून सचिन यादव मुतिजापूर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी आपल्या भाषणात सांगितले की पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आपल्या लेखनातून समाजातील चांगल्या गोष्टींचे दर्शन घडवतो, प्राचार्य गजानन बोचरे, समाजसेवक रविकुमार राठी व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक व्दारकाप्रसाद दुबे, बंडूभाऊ डाखोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभयसिंह मोहिते पाटील होते प्रमुख उपस्थितीमध्ये , पोलीस निरीक्षक सचिन यादव, पोलिस निरीक्षक कैलास भगत, ,रवी कुमार राठी, प्राचार्य गजानन बोचरे,द्वारकाप्रसाद दुबे, बंडूभाऊ डाखोरे, पिंजरचे प्रकाशभाऊ लहाने,सतीश गावंडे, रामकृष्ण गावंडे, विष्णू लोडम, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन दिपप्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे उद्घघाटक, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत उपस्थित सर्व पत्रकारांनी केले, कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा एल डी सरोदे यांनी केले तर व आभार समाधान इंगळे यांनी केले. यावेळी एजेएफसीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गणोरकर, अजय प्रभे ,प्रा एल डी सरोदे, मिलिंद जामनिक, समाधान इंगळे, रोहित सोळंके,प्रा राजकन्या खणखणे,प्रा अविनाश बेलाडकर,प्रा दिपक जोशी, शाम कोल्हाळे ,सेवकराम लहाने, संतोष भांडे,मिलिंद इंगळे, गौतम बनसोड , सुधीर कडू, सुनील वानखडे, नागोराव तायडे,अनील धुरदेव, निलेश तायडे,भुषण महाजन, स्वप्नील गणगणे, प्रशांत चिंचोळकर,अथर खान, नाजुक खंडारे, शाम प्रांजळे, भिमराव खंडारे, या पत्रकार बांधवांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला असता पत्रकारांचे स्वागत व सत्कार करण्यासाठी उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन सचिव रविकुमार राठी, दिलीप सरदार ,सुधीर कडू, आमदार हरीश पिंपळे यांचे स्वीय सहायक सुधीर दुबे यांनीही यावेळी पत्रकारांना भेट वस्तू देऊन स्वागत व सन्मान केला.
Users Today : 29