साई क्रांती रत्न, युवा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने गुरुवार(ता,०५) रोजी सकाळी शिर्डी चे साईबाबा यांचे साई सच्चरीत पारायण आरंभ झाले,व सायंकाळी संगीतमय तुलसी रामायण कथा रामायणाचार्य हभप विकास महाराज गायकवाड यांच्या अमृत वाणीतून आरंभ झाले, साई सच्चरीत पारायण साठी २०५ साई भक्त बसलेले आहेत, वाचक ज्ञानेश्वर माऊली गायकवाड आहेत,सायंकाळी रामायणाचार्य विकास महाराज गायकवाड यांचे खंडाळा गावात आगमन होताच लेझीम पथक व शोभेची दारू सोडून त्यांचे जोरदार स्वागत झाले,व्यासपीठावर प्रभू रामचंद्र यांची भव्य दिव्य मूर्ती आहे, साईबाबा यांचीही मूर्ती आहे,या समयी वैजापूर चे सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व महाराष्ट्र नारायणी सेनेचे अध्यक्ष अशोक आप्पा पवार यांनी विकास महाराज यांचे पूजन केले उपसरपंच यांनी सपत्नीक पूजन केले या समयी उत्तम पवार यांची उपस्थिती होती,मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छान नियोजन कलले आहे,बुधवार ता,११रोजी गावातून साई पालखी मिरवणूक निघणार व शिर्डीला व शुक्रवार ता१३रोजी पायी पालखी मिरवणूक शिर्डीला जाणार आहे(फोटो कॅप्शन- रामायणाचार्य विकास महाराज गायकवाड यांचे पूजन करताना धोंडीराम राजपूत व अशोक पवार)
Users Today : 18