मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी/- (मो रिजवान सिद्दीकी) फोटो
अकोला जिल्हा पत्रकार संघाशि संलग्न मुर्तिजापूर तालुका पत्रकार संघाचे वतीने आद्य पत्रकार वंदनिय बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती राष्ट्रीय महामार्गा वरील अग्रसेन फार्म हाऊस येथे साजरी करण्यात आली.
यानिमत्त झालेल्या चर्चेत पत्रकारांनी समाजभान व स्वपरिक्षण आत्मचिंतन करीत आपली पत्रकारीता अधिक प्रगल्भ करावी असा सुर होता. तसेच विविध उपक्रम राबविण्याविषयी चर्चा झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप देशमुख तर प्रमुख म्हणून संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान मुर्तीजापुर प्रमुख सतीश अग्रवाल प्राध्यापक अविनाश बेलाडकर प्राध्यापक दीपक जोशी अनवरखान सुधीर दुबे मोहम्मद शारीक कुरेशी मोहम्मद रिजवान सिद्दिकी अजय प्रभे गजानन तायडे बादशहा इ. उपस्थित होते. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच भारतीय ज्ञानपीठचे प्राचार्य तथा जेष्ठ पत्रकार स्व. विकास सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने सर्व पत्रकारांना भेटवस्तू देण्यात आली तसेच पत्रकार दिनाच्या निमित्ताने संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान मुर्तीजापुर प्रमुख सतीश अग्रवाल यांनी समस्त पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार अनवर खान यांनी केले
Users Today : 26