कॉटन नगरी मलकापूरला पांढऱ्या सोन्याला दिला अमित कॉटन फायबर ने 11 हजार सात रुपयांचा भाव

Khozmaster
3 Min Read

मलकापूर मध्ये अमित कॉटन फायबर्स या जिनिंगचे पुरोहितांच्या हस्ते सकाळी दहा वाजता शुभ मुहूर्तावर पूजा अर्चना व गणेशाला वंदन करून यावर्षीचा नवीन सुरू झालेल्या हंगामातील कापूस शेतकरी तोसिफ भाई मुक्ताईनगर यांनी ॲपे रिक्षामध्ये कापूस आणला त्या कापसाची विधिवत ब्राह्मणाच्या हस्ते पूजा अर्चना करून अमीन कॉटनचे संचालक श्री सुभाष द्वारकादास चौधरी व श्री राजू द्वारकादास चौधरी या बंधुंनी सात क्विंटल सात किलो या कापसाला 11 हजार सात रुपयांचा भाव घोषित केला जो जो कापूस शेतकरी तोसिफ भाई हे मुक्ताईनगर वरून येथे घेऊन आले होते हा भाव मिळाल्यानंतर तोसिफ भाई खूप आनंदित झाल्याचे दिसले असाही भाव जर शेतकऱ्यांना मिळाला तर शेतकरी आत्महत्या थांबतील असे ते म्हणाले अमित कॉटनचे संचालक राजू चौधरी आपल्या मनोगत म्हणाले की नवीन नवीन व्यापारी गाव खेड्यातील व्यापारी जीन मालका पेक्षाही जास्त भाव काढतात याच चालू हंगामात कोणी 14 हजाराचे कोणी 16 हजाराचे भाव काढल्याचेही आमच्या वाचण्यात आले पाहण्यात आले परंतु व्यापार हा व्यापार लाईनच व्हायला पाहिजे नाहीतर हे मुहूर्ताचे उद्घाटनाचे भाव असतात हेच भाव मजूर वर्गांना जर माहित पडले तर मजूर वर्ग शेतकऱ्यांना कापूस वेचणीचे पंधरा रुपये वीस रुपये किलोचा वेचणीचा भाव मागतात असेही एका शेतकऱ्याने सांगितले यावर्षी कापूस हंगाम चांगला असून असेच भाव राहतील असे राजू द्वारकादास चौधरी यांनी सांगितले शुभ मुहूर्त उद्घाटन कार्यक्रमाला अमित कॉटन फायबरचे संचालक मंडळ श्री सुभाष दर्गा चौधरी राजू दादा चौधरी श्री अशोक नारायण अग्रवाल श्री पवन जी अग्रवाल श्री गणेश अशोक अग्रवाल श्री सुमित शामसुंदर चौधरी श्री निखिल सुभाष चौधरी श्री अमित श्याम सुंदर चौधरी श्री प्रणय राजू चौधरी व कॉटन नगरी मलकापूर मधील प्रसिद्ध कापूस उद्योजक आशुतोष इंडस्ट्रीज मातोश्री जिनिंग जनक जिनिंग बाहेती जिनिंग प्रदीप जी राठी गोविंद शेठ माहिती अरुण डांगाजी अमित सेठ दंड मुरली शेठ चौधरी संतोष शेठ डांगा हे जिनर्स उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते अन्नदानाच्या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी अमित कॉटन फायबरच्या या कर्मचाऱ्यांनी महेंद्र पाटील पंकज अग्रवाल प्रशांत धांडे दिनेश कोलते पंकज सांबरे पवन हरसुले अमोल अंगाईत तुषार दुधे विशाल मुके सागर पाटील प्रतीक अग्रवाल सागर निंबाळकर पंकज आगलावे गणेश जी गुडगीला योगेश गायकी गणेश जाधव विशाल गुलगे अजय चिखलकर गौरव बोरसे या कर्मचाऱ्यांनी बाहेरगावावरून आलेल्या कॉटन ब्रोकर्स शेतकरीवर्ग व्यापारी या सर्वांचं एकत्र येतो चित्त स्वागत केले या कार्यक्रमाला ज्येष्ठ कॉटन ब्रोकर्स सुभाष मोरे नामदेव चव्हाण मलकापूर येथील कॉटन असोसिएशनचे सर्व कॉटन ब्रोकर्स हजर असल्याचेही दिसले या कार्यक्रमाला नांदुरा मोताळा वडनेर मलकापूर व खानदेश मधील सर्व व्यापारी वर्ग व कॉटन ब्रोकर्स उपस्थित होते

 

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *