दिपक मापारी, रिसोड :- शासनाने प्रसिद्ध केलेल्या दि.08/09/2022 रोजीच्या अतिवृष्टी व खरडून गेलेल्या जमिनीचा तापशील यादीमध्ये वाशिम जिल्हा पूर्णपणे डावलला असून जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे तुर पिक हे मोठ्या प्रमाणात जळाले आहे. बहुतांश ठिकाणी शेती खरडून गेलेली आहे. पिकांची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लागली आहे. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिसकावून गेला आहे. शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक आशा मध्यंतरी निर्माण झाली होती. या सरकारकडे जण-सामान्यांचे कष्टकरी शेतमजूर गोरगरीब यांचे अपेक्षेपोटी लक्ष होते. पण सदर जिल्हा प्रसिद्ध यादीमधून डावलला असून शेतकरी राजा चिंतेत आहे.आणि म्हणून सदर जिल्हा प्रसिद्ध केलेल्या दि.08/09/2022 च्या यादीमध्ये सामावून घ्यावा व जिल्ह्यातील शेतकरी राजाला न्याय द्यावा ही आपल्याकडे आग्रही विनंती निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे कडे मा. जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांचे मार्फत कास्तकार फाऊंडेशन च्या वतीने अध्यक्ष विष्णु बाजड यांनी केली..