विशेष महिला ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारीत..
दिपक मापारी, रिसोड : येथून जवळच असलेल्या ग्राम बेलखेडा येथील महिला मागील दोन अडीच महिन्यांपासून विविध माध्यमांच्या जसे (निवेदने,तक्रारी) यांचा पाठपुरावा करत यांनी पारित केलेल्या ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी झटत होत्या.ग्राम बेलखेडा येथील ग्रामपंचायतने दिनांक २०/०२/२०२० रोजीच्या ग्रामसभेमध्ये ग्राम बेलखेडा येथे देशी दारूच्या व बियर शॉपीच्या दुकानासाठी परवाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र देऊ केले होते.ही बाब गावातील सुजान नागरिकास व महिलांना माहिती मिळतास त्यांनी या निर्णयाची कडाडून निंदा केली होती. या प्रश्नाला ग्राम बेलखेडा येथील महिलांनी पंचायत समिती रिसोड, जिल्हा परिषद वाशिम,जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे वेळोवेळी तक्रारी करून आपला रोष व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी दिनांक 13 /8/ 2022 रोजी पंचायत समिती कार्यालय रिसोड समोर उपोषणही केले होते त्यात त्यांना ऑगस्ट महिन्याच्या ग्रामसभेत सदर दारूच्या दुकानचा व बियर शोपीच्या ठरावाचा विषय विचारास घेण्यास लेखी देण्यात आले त्याच्याच परिणाम स्वरूप ग्रामपंचायत बेलखेडा यांनी दि.२८/०८/२०२२ रोजी महिलांची विशेष ग्रामसभा बोलावत सदर दारूचे दुकान व बियर शॉपीच्या दुकानचा ना हरकत परवाना रद्द केला.सोबतच गावातील पंचवीस टक्के महिलांच्या सह्यानिशी सदर ठराव पारित झाला. याविषयी बेलखेडा येथील ग्रामस्थांनी त्यांची मागणी जिल्हाभरात पोहोचविण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल सायं.दैनिक खोजमास्टर चे आभार मानले..