व्हॉईस ऑफ मीडियातर्फे विमा पॉलिसीचे वितरण.

Khozmaster
3 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार -:पत्रकारांचे हित साधायचे असेल तर एकजूट होणे गरजेचे आहे. व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या लढा व हितासाठी काम करणारी संघटना आहे. सर्व पत्रकारांच्या हितासाठी एकत्र येऊन काम केल्यास नक्कीच पत्रकारांच्या समस्या व अडचणी सुटतील असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत यांनी केले.
नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात व्हाईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हा या संघटनेच्या वतीने आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दीनानिमित्त पत्रकार दिनी प्रतिमा पूजनासह विमा पॉलिसीचे वितरण व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत यांच्या हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर होते. व्यासपीठावर सचिव राकेश कलाल, कार्याध्यक्ष धनराज माळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, कन्यादान मंगल कार्यालयाचे संचालक संदीप चौधरी, उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी प्रास्ताविकातून व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्याची माहिती दिली. व्हॉईस ऑफ मीडिया सकारात्मक दृष्टीने लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा या दृष्टीने काम करणारी संघटना आहे. पत्रकारांसाठी गृहनिर्माण सोसायटी व पत्रकार भवनाची निर्मिती करणे हा उद्देश या संघटनेचा आहे. नंदुरबारला काही वर्षांपूर्वीच पत्रकारांकरिता गृहनिर्माण सोसायटी झाली असती, परंतु काही कारणास्तव गृहनिर्माण सोसायटीचा विषयी लांबणीवर पडल्याने ती होऊ शकली नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. म्हणून आता पत्रकारांच्या हितासाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध होऊन संधी मिळाली आहे. त्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन वाईस ऑफ मीडिया देशभरातील संघटनेत सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी केले. कार्याध्यक्ष धनराज माळी यांनी सांगितले की, या संघटनेतून पत्रकारांचे हित साधण्याचा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीनेच संघटनेचे कार्य असून पत्रकारांनी या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत म्हणाले की, पत्रकार नेहमीच समाजाच्या हितासाठी काम करत असतो. पूर्वीची पत्रकारिता करताना खूप परिश्रम घ्यावे लागायचे म्हणून आजची पत्रकारिता ही डिजिटल पत्रकारिता बनली आहे. असे असले तरी वाचक आजही वृत्तपत्र वाचण्यास प्राधान्य देतात. बदलत्या पत्रकारितेच्या स्वरूपाप्रमाणे पत्रकारांनी देखील आपल्यातील मतभेद असले तरी मनभेद होऊ देऊ नये. वाद असला तरी संवाद असणे देखील गरजेचे आहे. याच दृष्टिकोनाने पत्रकारांनी काम केल्यास पत्रकारांचे हित साधण्यास मदत होईल व्हॉईस ऑफ मीडिया सारख्या देशभरातील संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी कार्य होणे देखील महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे प्रवक्ता रवींद्र चव्हाण यांनी केले आभार सरचिटणीस राकेश कलाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
    पत्रकारांची आरोग्य तपासणी
लायन्स क्लब नंदुरबार व व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार यांच्या विद्यमाने आयोजित पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. यावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी डॉ. नूतन शहा यांनी केली. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. नुतन शहा, डॉ. जयंत शहा अनिल पाटील, महेश देसाई, राहुल पाटील, आनंद रघुवंशी, आशिष शिंपी, रामेश्वर शिरसाठ आणि व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *