मूर्तिजापूर – तालुक्यातील माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी आपल्या ताफ्यासह दोन ट्रॕक्टर मधून वाहून नेल्या जाणारी ८ हजाराची अवैध चोरटी वाळू १४ लाखाच्या २ ट्रॕक्टर सह दिनांक ७ जानेवारी रोजी रात्री जप्त केली.अवैध वाळू चोरीला आळा घालण्याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक मोनीका राऊत व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनात माना पोलीस स्टेशनमध्ये २ अधिकारी व ५ अंमलदार यांचे दोन चमू तयार करण्यात आले. गस्त सुरू झाली. आरोपी शुभम गजानन समदुरे राहणार बोर्टा हा हिवरा फाट्यावर ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अवैध चोरटी वाळु वाहतुक करतांना आढळला. त्याच्या महिंद्रा कंपनीच्या ७ लाख रूपये किंमतीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह ४ हजार रुपये किंमतीची १ ब्रास चोरटी वाळू असा एकुण ७ लाख ४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या घटनेत दिगांबर रामकृष्ण गावंडे राहणार खरबडी व आरोपी महेश गजानन बेगडे राहाणार बोर्टा याच्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अवैध चोरटी वाळु वाहतुक करतांना आढळला. त्यांच्यावर कारवाई करून अंदाजे ७ लाख रुपये किंमतीचा ट्रॕक्टर व ७ हजार रूपये किंमतीची १ ब्रास रेती असा एकुण ७ लाख ४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.एकूण १४ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करून वाळू माफीयांना धडकी भरविणाऱ्या या धाडसी कारवाईत ठाणेदार कैलास डी.भगत, उपनिरीक्षक घनश्याम पाटील, कॉन्स्टेबल उमेश हरमकर, जय मंडावरे, पंकज वाघमारे, सुशील आठवले पो.काॅ.आकाश काळे सहभागी झाले.
Users Today : 26