पातुर प्रतिनिधी रामेश्वर वाढी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन कार्यक्रम तसेच बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,अंकुर साहित्य संघ, स्वर साधना संगीत अकॅडमी पातुर यांच्यावतीने 6 जानेवारी 2023 रोजी पातुर येथील संत सेवालाल महाराज सभागृहामध्ये पार पडला
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार दीपक बाजड होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पातूर ठाणेदार हरीश गवळी, नायब तहसीलदार विजय खेडकर, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर रुद्रकार, ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे, ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे, अंकुरचे केंद्रीय संघटक डॉ मनोहर घुगे, प्रदीप दिवनाले, प्राचार्य जयसिंग जाधव, अंकुरचे पातुर तालुका अध्यक्ष नारायण रावजी अंधारे, स्वर साधना अकॅडमीचे संगीत तज्ञ प्रा विलास राऊत, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले आदी मंचावर उपस्थित
होते याप्रसंगी सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या आणि जेष्ठ पत्रकारांच्या वतीने करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला
यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय पत्रकारिता करणारे पत्रकार राजारामजी देवकर, देवानंद गहिले, गोपाल गाडगे, संजय गोतरकर, निशांत गवई, रमेश देवकर, छगन कराळे, दुलेखान युसुफ खान, सुधाकर राऊत, विजय सरदार, गजानन येनकर, अविनाश पोहरे, किरण निमकंडे, अमोल करवते, संदीप देशमुख, माणिकराव ठाकरे, बाळाभाऊ सरोदे, रमेश नीलखन, जनार्दन हिरळकर, सतीश हातोले, फरहान अमीन, अजिंक्य निखाडे, पवन तांबे, शेख सलीम, पंकज पोहरे, सय्यद हसन बाबू आदींचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान पातुर तहसीलदार दीपक बाजड, नायब तहसीलदार विजय खेडकर, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर रुद्रकार तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी तहसीलदार दीपक बाजड, पातूर ठाणेदार हरीश गवळी आणि गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर रुद्रकार यांनी बोलताना पातूरच्या पत्रकारांनी जीवाची परवा न करता कोरोना काळामध्ये योगदान दिले आहे
हा पत्रकारांचा त्याग विसरता येणार नाही पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे बाणेदार
लेखणी दार पत्रकारांचे कौतुक व्यक्त करून पत्रकार बांधवांना यावेळी शुभेच्छा दिल्या
तसेच अंकुर साहित्य संघाच्या नवनियुक्त पदाधिकारी
श्री नारायणरावजी अंधारे, प्रा. विठोबा गवई, सूर्यकांत उर्फ छोटे भाऊ जोशी, भारतीताई गाडगे, सौ निशाताई गाडगे, प्रा शंकर गाडगे, नंदकुमार ठक, प्रा मुकुंद कवळकार, डॉ. शांतीलाल चव्हाण, कृष्णराव घाडगे, प्राचार्य जयसिंग जाधव, जीएम देशमुख, गोकुल भाई हरणे, पी एम बोचरे, प्रा गजानन रोडे, देवानंद गवई, वसंत गाडगे, सुरेश डाबेराव, आदींचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला आहे
या कार्यक्रमात ग्रंथालय परीक्षेत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरलेल्या भाग्यश्री गवई, नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या निखिल चव्हाण, तर सुमित चव्हाण स्केटिंग, अपर्णा जामोदे ( एमएसईबी) बाळादेवी इंग्लिश कॉन्व्हेंट चे विद्यार्थी शरयू बंड ,अनन्या बंड, भावेश सावंत, सोहम डाखोरे आदींचा सत्कार करण्यात आला आहे तसेच कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची परवा न करता कार्य करणाऱ्या नंदकुमार गावंडे यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
त्यानंतर प्रा विलास राऊत, मोहम्मद रफी फेम गायक देविदास नीलखन, लता फेम प्रा करुणाताई गवई, प्रा कीर्ती डोंगरे, प्राचार्य अश्विनी
धरमठोक, पत्रकार राजाराम देवकर ,पत्रकार देवानंद गहिले, सादिक खान, राजीक भाई, राजेश वावगे, डॉ मनोहर घुगे, ज्येष्ठ साहित्यिक तुळशीरामजी बोबडे, विशाल राखोडे, प्रा. विठोबा गवई आदींनी एकापेक्षा एक अशी सकस गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली
यावेळी संगीताची साथ सुप्रसिद्ध तबलावादक मंगेश राऊत, मनोज राऊत, प्रा विलास राऊत यांनी दिली
पत्रकार सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल गाडगे यांनी केले
तर गीत गायन कार्यक्रमाचे संचालन संदीप देऊळगावकर सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन देवानंद गहिले यांनी व्यक्त केले
यावेळी महिला यशस्वी उद्योजिका सौ वर्षाताई बगाडे, सौ वैशालीताई निकम, सुप्रिया इंगळे, डॉ. मोरेश्वर गोतरकर, निलेश गाडगे, वीर पिता काशीरामजी निमकंडे, रवी मेसरे, महफूज खान, विजय गणवीर, गुरुकृपा कॉलेज अकोला चे प्राचार्य उमेश देशमुख, प्रा. अंकुश खराटे, प्रा. बोर्डे, प्रा. बघे, सुहास कोकाटे, रामकृष्ण खंडारे, रमेश वरणकर, रामदास सातारकर, बाबाराव गवई, मनोरमा गवई,आदी मान्यवर यांच्यासह प्रतिष्ठित पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती.
Users Today : 26