प्रतिनिधी रामेश्वर वाढी स्थानिक आर एल टी विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी शैलेश अलोने यांचा सत्कार नामदार मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक व चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ही पत्रकार दिनी म्हणून साजरी करण्यात येते याचे औचित्य साधून शैलेश अलोने यांना शाल व श्रीफळ आणि शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला सहा जानेवारी रोजी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृह रामाळा तलाव रोड चंद्रपूर येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अलोने यांनी समाजकार्य, पत्रकारी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या मार्फत ग्रामीण भागातील तळ्या गळ्यातील पत्रकार एकत्रित आणून न्याय हक्कासाठी लढा दिला गोरगरीब होत करू यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सर यांनी सुद्धा आपल्या भाषणात आर एल टी महाविद्यालया मध्ये ड्युटी करून समाज कार्य करणे न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणे ही चांगली बाब आहे असे उदगार काढले विदर्भ मध्ये नावाजलेले महाविद्यालय असून ए ग्रेट प्राप्त असे हे महाविद्यालय असल्याचे अलोने यानी आपल्या भाषणातून म्हणाले यावेळी अशोक करे प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, पंकज सपाटे मुख्य अभियंता चंद्रपूर, किरण मोरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, मुकेश टांगले कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम चंद्रपूर, राजेश येसनकर जिल्हा माहिती अधिकारी चंद्रपूर, सुनील पाटील अध्यक्ष संघर्ष समिती चंद्रपूर, देवनाथ गंडाटे सदस्य डिजिटल मीडिया ग्रीवेस ऑफ कौन्सिल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम चंद्रपूर गडचिरोली संपादक पत्रकार संघाच्या वतीने संजय कन्नावार संपादक साप्ताहिक चंद्रपूर क्रांती, व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना 67 65 चे प्रभारी अध्यक्ष यांनी आयोजित केली होता. यावेळी जूनमलवार संपादक कुमार दर्पण, डी एस खाजा जिल्हा प्रतिनिधी विदर्भ प्रिंट, रकीब शेख साप्ताहिक कॉल सिटी खबर तसेच दैनिक चंद्रपूर समाचार संपादक चंद्रगुप्त रायपुरे सोमेश्वर येलचलवार स्पोर्ट न्यूज संपादक तसेच सर्व मान्यवर व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीत अतिशय धूम धडाक्याने संपन्न झाला.
Users Today : 26