6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांना लवकरच वाच्या फोडणार – आमदार नितीन देशमुख शिवसेना पातूर शहर प्रमुख निरंजन बंड यांनी पत्रकार दिनी केले सर्व पत्रकार बांधवांना सन्मानित

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी अविनाश गवई पातूर शहराला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नव्याने शिवसेना पातुर शहर प्रमुख पदी निरंजन बंड यांची निवड केली असून या नियुक्ती निमित्त व पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सोबत शेतकऱ्यांच्या समस्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा, शेतकऱ्यांना शेती विषयक विद्युत पुरवठा सतत ठेवण्याकरिता, ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी पुरवठा सलग्नित, विकासात्मक धोरण ठेवून निधी विषयक बैठक संपन्न झाली असता आज पत्रकार दिन 6 जानेवारी असल्याने आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार दिनाचा दिवस निवडून शेतकऱ्यांना लवकरच शेतीतील वीज पुरवठा विषयी असलेल्या समस्यांना शासनाच्या पाटलावर मांडून जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडवणीस यांच्या समोर खंबीरपणे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची बाजू मांडणार अशी माहिती पातुर बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार दिनानिमित्त पातुर शहरातील व तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले नव्याने पदग्रहण स्वीकारणारे पातूर शहर शिवसेनाप्रमुख निरंजन बंड यांनी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांना दैनंदिन काम करत असताना लागणाऱ्या महत्त्वाच्यी वस्तू हॅन्डबॅग देऊन पत्रकार यांना गौरविण्यात आले यावेळी आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, पातूर तालुका शिवसेना अध्यक्ष रवी मूरतंडकर, माजी नगरसेवक परसराम उंबरकार, सुनील गाडगे,नव्याने रुजू झालेले पातूर शहर पक्षप्रमुख निरंजन बंड, माजी नगरसेवक सुरेंद्र उगले, युवा तालुका प्रमुख सागर रामेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल निमकंडे, शंकरराव देशमुख, दिलीप फुलारी, बंडू देवकर, कैलास बगाडे, दिलीप देवकर, आनंद तायडे, सचिन गिरे ,अंबादास देवकर , विशाल गोतरकार, किशोर फुलारी, स्वप्निल परमाळे, रवी काकड, संतोष गवई, सतीश देशमुख, राजू राठोड यांच्या सह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते याच्या उपस्थितीत पत्रकार दिनानिमित्त पातुर शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला    विषेश हा कार्यक्रम सुरू असताना नव्याने बोडखा ग्रामपंचायत मध्ये सरपंच विशाल वानखडे,उपसरपंच पदी विराजमान झालेले रविंद्र बबन डाखोरे यांचा आमदार नितीन देशमुख व पातूर शहर प्रमुख निरंजन बंड यांच्या हस्ते काही सदस्य याचा शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप काळपांडे यांनी केले तर पत्रकारांपैकी पत्रकार दिनानिमित्त मनोगत उमेश देशमुख यांनी व्यक्त केले आहे तर आभार प्रदर्शन मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कुदुस शेख यांनी केले.

 

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *