चांन्नी चतारी फाटा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरा समोर धडक तिघेजण गंभीर जखमी,चांन्नी पोलिसांची तत्परता

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :– तालुक्यातील असलेल्या चांन्नी ते चतारी फाटा रस्त्यावर दि 8 रोजी दुपार 2 वा दरम्यान दोन दुचाकीच्या समोरा समोर धडकेमध्ये तिघेजण गंभीर जखमी होण्याची घटना घडली.प्राप्त माहिती नुसार चतारी येथील रहिवासी सतीश सिद्धार्थ सदार हे कामानिमित्त चांन्नी कडे मोटारसायकल बाईकने जात असतांना तसेच जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गुटी गावचे ज्ञानेश्वर नामदेव चंद व विनायक किसन चंद हे दोघेजण बाईकने चांन्नी ते चतारी फाटा रस्त्याने चांन्नीवरून वाडेगावकडे जात असताना चांन्नी येथील जय बजरंग विद्यालय व बसस्टँड दरम्यान दोन बाईकची समोरा समोर दि 8 रोजी दु 2 वा सुमारास जबर धडक झाली.घटनेचे ठिकाण चांन्नी पोलीस स्टेशन नजीक असल्यामुळे, सदरची माहिती ठाणेदार योगेश वाघमारे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांन्नी पोलिसांनी वेळ न दवडता जखमींना प्राथमिक उपचारार्थ चतारी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.व पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिका 108 ने अकोला सर्वोपचार मध्ये नेण्यात आले.दरम्यान यावेळी चतारी येथील पोलीस पाटील विजय सरदार त्याचप्रमाणे चांन्नी व चतारी येथील ग्रामस्थांनी मोलाची मदत केली. रस्ते अपघात नोंद केला असून घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचारार्थ चतारी ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले तद नंतर पुढील उपचारार्थ 108 रुग्णवाहिकेने अकोला येथे हलविण्यात आले. योगेश वाघमारे

चांन्नी पोलीस ठाणेदार

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *