(ठाणे प्रतिनिधी ) पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे व राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या आदेशान्वये राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गर्शनाखाली दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,मुंबई शाखा ठाणे जिल्हाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण तालुक्यातील खडवली आदिवासी आश्रम शाळेत पत्रकारांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप , पत्रकार संघाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा असे विविध उपक्रम हाती घेत सामाजिक बांधिलकी जपत ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे,युवासेना ठाणे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर,सरपंच दिपाली शेलार, डोहोळे ग्रामपंचायत माजी सरपंच, सचिन घोडविंदे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, गांवदेवी शिक्षण संस्था खडवली अध्यक्ष ताराबाई चव्हाण,सेवा सोसायटीचे चेअरमन मंगेश शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. २०२३ मंध्ये पत्रकारांची विमा पॉलिसी काढण्याची एक चांगली संकल्पना भगवान चंदे यांनी मांडली असून या संकल्पनेचे पूर्ण ठाणे जिल्ह्यात कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा ठाणे जिल्ह्याच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे हस्ते ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांना सन्मानित करण्यात आले.आजची पत्रकारिता भरकटली जात असून, पत्रकार दिनाच्या वेळी राजकीय पक्षांनी कार्यक्रम ठेवणे चुकीचे आहें.वर्षभर पत्रकार राजकारण ,समाजकारण शिक्षण आरोग्य ,सामाजिक उपक्रमात सहभागी असतो मग पत्रकार दिन पत्रकारांसाठी राखीव का नको हि बाब आमच्या पत्रकारांनी ध्यानात घ्यायला पाहिजे.राजकीय पक्ष्यासारखे पत्रकारांचे गट पडायला नको. निस्वार्थी भावनेने पत्रकारिता व्हायला हवी सत्याची आणि सामान्यांची कास धरायला पाहिजे असे मत पत्रकार भगवान चंदे यांनी मांडले. पुढे असेही म्हटले की,पत्रकारांनी डोकं लावल्यावर कित्येकांची झोप उडते त्याबाबत पत्रकार शरद धुमाळ,रमेश हिंदुराव ,संतोष गायकर यांच्या अनेक बातम्यांची उदाहरणे सांगितली.बातमीमुळे शासनाला देखील दखल घ्यावी लागते. पत्रकारांच्या मागण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या मागण्या ह्या मोठ्या आहेत. आणि सर्वसामान्यांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी जो काम करतो तोच खरा पत्रकार असल्याचे भगवान चंदे यांनी बोलतांना सांगितले. जादूकलेच्या माध्यमातून विज्ञानावर आधारित जादुगार एस. महेंद्रा यांनी विविध जादूचे प्रयोग सादर करीत जगात कोठेही जादू नसते ही फक्त हात चलाकी असते. म्हणून भोंदू बाबांना बळी पडू नका असे आवाहन जादूगार एस. महेंद्रा यांनी नागरिकांना केले. पत्रकारांनी ठरविले तर कुणाचेही बारा वाजू शकतात. पत्रकार समाजाला दिशा देणारा घटक असून लोकशाहीत त्यांचे स्थान अबाधित राहिलेच पाहिजे.असे यावेळी माजी सभापती अशोक शेरेकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे ठाणे जी.कार्याध्यक्ष संतोष गायकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश हिंदुराव, जैतु मुठोलकर, महेंद्र सोनावणे, मेघनाथ विशे,योगेश गोडे, सुनिल घरत, ओमप्रकाश भरोदे,पद्मिनी राजपूत,अंगणवाडी शिक्षिका तारा लोणे, शिक्षक रमेश जाधव यांच्यासह पत्रकारांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवूनस सन्मानित करण्यात आले.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे, मार्गदर्शक अरविंद म्हात्रे, भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे, भिवंडी मनपा कार्यक्षेत्र अध्यक्ष नितीन पंडित, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकर,तालुका सचिव मिलिंद जाधव यांनी तर आदींनी मेहनत घेतली.यावेळी जिल्हा माजी सभापती अशोक शेरेकर, पोलीस मिञ हमीद शेख , पत्रकार नाना म्हात्रे, उपाध्यक्ष सुभाष विशे, जिल्हा सचिव नरेश पाटील,प्रकाश जाधव, संजय भोईर,शंकर करडे, दिलिप पवार,सतीश घरत,अनंता घागस,सिद्धार्थ गायकवाड,राकेश शिवदे, अनिल पाटील, दिनेश घनघाव, योगेश गोडे, सचिन पोतदार, वसंत पानसरे, अरुण जामदार, मोनिश गायकवाड उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी तर आभार पत्रकार मिलिंद जाधव यांनी केले.
Users Today : 16