डिजिटल 7/12 चे जनक रामदास जगताप एसीबीच्या जाळ्यात

KHOZ MASTER
1 Min Read

मुंबई

महसूल विभागातील डिजिटल 7/12 प्रणाली राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि सध्या नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले Ramdas Haribhau Jagtap यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सिडको (CIDCO) कार्यालयात १३ मे २०२६ रोजी एसीबीने ही कारवाई केली. सिडकोच्या २२.५ टक्के योजनेअंतर्गत जमिनीच्या करार प्रक्रियेसाठी रामदास जगताप यांनी तक्रारदाराकडे २२ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात जगताप यांच्या सांगण्यावरून शिपाई Haresh Sonawane यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्याचे समोर आले असून, त्यालाही अटक करण्यात आली आहे.

रामदास जगताप हे महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे विशेष चर्चेत आले होते. त्यांच्या अटकेनंतर महसूल आणि प्रशासकीय विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

रामदास जगताप यांचे मूळ गाव जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे असल्याची माहिती समोर आली आहे.

0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *