बहुजन जनता लोककलावंत दलाच्या वतीने अकोला येथे राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन.पंडिभाऊ दाभाडे

Khozmaster
2 Min Read

अकोला  पुरोगामी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज .छत्रपती शाहू महाराज. मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर .लोकशाहीर अण्णाभाऊ साठे .यांच्यासह इतरही महापुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकून त्यांचा इतिहास गीता द्वारे आणि पोवाडे तर नाट्य रूपांतर करून सामान्य माणसापर्यंत पोहोचवणारे राज्यातील बहुजन दलित समाजातील लोककलावंतांना संघटित करण्यासाठी लोककलावंत .शाहीर लावणी भारुड. वासुदेव .नाट्य .नाटिका .सांस्कृतिक कार्यक्रम .गायन .वादक .नृत्त्य.पथनाट्य .आणि इतर लोक कलावंतांनी आपले आयुष्य पणाला लावले अशा व्यक्तीना व संस्था. कलापथक मंडळ .यांना संघटित करून त्यांना केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन राज्यातील कलाकारांच्या आणि कलावंतांच्या आर्थिक विकासासाठी व त्यांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी तर त्यांच्या विचाराची देवान घेवाण होण्यासाठी पंडितभाऊ दाभाडे संस्थापक अध्यक्ष असलेल्या बहुजन जनता दल .प्रणित बहुजन जनता लोककलावंत दलाची नव्याने स्थापना करून राज्यस्तरीय .विभागीय स्तरीय .जिल्हास्तरीय .तालुकास्तरीय .शहरस्तरीय .कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून लोक कलावंताच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बहुजन जनता दल प्रणित बहुजन जनता लोककलावंत दलाच्या वतीने अकोला येथील अशोक वाटिका येथे मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी दुपारी १ वा. बहुजन जनता लोककलावंत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी केले आहे.   अशोक वाटिका अकोला येथे होणाऱ्या बहुजन जनता लोककलावंत दलाच्या राज्यस्तरीय मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याने समाधान हेगडे पाटील ( नाशिक) आणि राज्यस्तरीय राज्यपाल पुरस्कार प्राप्त शहजान मुकेरी (निफाड नाशिक) उपस्थितीत राहणार असून अकोला जिल्ह्यातील लोक कलावंतासह राज्यातील लोक कलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहुन आपले नाव नोंदणी करून घ्यावे राज्यातील सुप्रसिद्ध बुद्ध भीम गायक नागसेन सावदेकर बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे. लोकशाहीर देविदास. सावदेकर.विदर्भ सुप्रसिद्ध शाहीर खंडोजी शिरसाट. पत्रकार शाहिर डि .जे .वानखडे सुप्रसिद्ध गायिका शिलाबाई सदार यांच्या सह बहुजन जनता दल प्रणित बहुजन जनता लोककलावंत दलाच्या कार्यकर्त्यांनी व अकोला जिल्ह्यातील बहुजन जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे . असे लोकशाहीर देविदास सावदेकर.गायिका शिलाबाई सदार व पत्रकार डि.जे.वानखडे यांनी कळविले आहे

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *