राज्याभिषेक

Khozmaster
1 Min Read

2) राज्याभिषेक ..

 

शिवा राज्याभिषेक

खुशीत सारे किल्ले

भगव्या रंगा न्हाहले 

नाचे गल्ली मोहल्ले

 

भगवे झेंडे लहरती

आनंदी झाले जिल्हे

स्वराज्याचे स्वप्नगोड

अरे प्रत्यक्षांतआल्ले

 

भेटवस्तू उस्फुर्त त्या

भरले तिजो-यागल्ले

समानतेच्या तराजूत

निर्भेळ सुख तोलले

 

दगड धोंडे न् कपारी

जयकार सारे बोलले

वारा सुगंधीत झाला

दिशांनी गाणे गायले

 

आवाज पोचे दिल्ली

मुगलसाम्राज्य हलले

शत्रुला असेल वाटले

उगाच केले बा हल्ले 

 

अभिषेक करता जल

रे स्वतःचं धन्य झाले

क्षण अविस्मरणीय ते

इतिहासा अमर केले

 

– हेमंत मुसरीफ पुणे.

   9730306996

  www.kavyakusum.com

0 9 4 2 4 3
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *