माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुरावा.

Khozmaster
2 Min Read

प्रविण चव्हाण 

मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या लाभ.

नंदुरबार. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनातून तलवाडे खुर्द (शनिमांडळ) ता.नंदुरबार येथील मयत शेतकऱ्याच्या शासनामार्फत कुटुंबीयांना २ लाख थेट खात्यात जमा करण्यात आले आहेत.नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्द (शनिमांडळ) येथील शेतकरी देवीसिंग राजपूत यांचे मागील वर्षी शेतात काम करीत असतांना विहिरीत तोल जाऊन पडून गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे रुग्णालयात निधन झाले. घराच्या कर्ता कमावता व्यक्तीचे अचानक निधन झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतकरी अपघाताची माहिती गावातील नागरिकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी कळविले.माजी आ.रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय राजपूत यांनी मयताचा कुटुंबीयांकडून कागदपत्रांची जुळवाजुळवा करून जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी प्रस्ताव दाखल केला. माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांसोबत पाठपुरावा केल्याने नुकताच मयत शेतकरी देवीसिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांना २ लाख थेट खात्यात जमा करण्यात आले. मयत शेतकरी देवीसिंग राजपूत यांच्या कुटुंबीयांनी आमदार कार्यालयात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली व आभार मानले.यावेळी जि.प माजी उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी,नगरसेवक यशवर्धन रघुवंशी ,शनिमांडळ येथील ज्येष्ठ नागरिक मकेसिंग राजपूत, माजी नगरसेवक नरेंद्र गिरासे, सामाजिक कार्यकर्ता दिग्विजयसिंग राजपूत उपस्थित होते.

संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ

यापूर्वीच मयत शेतकरी देवीसिंग राजपूत यांचा पत्नीचे २०१८ मध्ये आजारपणाने निधन झाले होते. त्यामुळे त्यांचे दोन्ही बालके मोक्षदा व मोहित राजपूत अनाथ झाले.दोघांच सांभाळ आजोबा मखेसिंग राजपूत यांनी केला. सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय राजपूत यांनी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत कुटुंबियांचे कागदपत्र तहसील कार्यालयात सादर केले. या प्रकरणात देखील माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला.

तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्याने अनाथ दोन्ही बालकांना योजनेच्या लाभ मिळत आहे.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *