पदवीधर निवडणूकीसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती.

Khozmaster
4 Min Read

 प्रविण चव्हाण

नंदुरबार – : महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिंक निवडणूक २०२२-२३ कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी व सहायक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

आचारसंहिता कक्ष :- नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करणे, आयोगास अहवाल सादर करणे, एसएसटी, एफएस, व्हीएसटी, व्हीव्हीटी यांच्या कामकाजावर पर्यवेक्षण व संनियंत्रण करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे व तहसिलदार उल्हास देवरे यांची नेमणूक केली असून त्याना सहायक म्हणून नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी, गणेश बोरसे, सुरेश अहिरे हे असतील.

मतदार केंद्रस्तरीय महत्वाचे साहित्य :- मतदान केंद्रावरील महत्वाचे साहित्य, मतपत्रिका, चिन्हांकित मतदार यादी, विभेदक चिन्ह, न पुसरणारी शाई, पितळी सील, मतदानाचे विशिष्ट पेन हे साहित्य प्राप्त करुन प्रत्येक मतदान केंद्रनिहाय वाटप करणेसाठी समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर नेमणूक केली असून सहायक कर्मचारी म्हणून कैलास कुवर, किशोर पेटकर, अविनाश खोरणे हे असतील.

मतदान केंद्रस्तरीय इतर साहित्य :- मतदान केंद्रावरील महत्वाचे साहित्य वगळता इतर सर्व साहित्य प्राप्त करुन प्रत्येक मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून तहसिलदार सुरेश कोळी तर सहायक कर्मचारी म्हणून लंकेश कलाल, संजय भावसार हे असतील.

प्रशिक्षण व्यवस्था :- निवडणूक संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हांतर्गत प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, प्रशिक्षणाकरिता सभागृह, प्रोजेक्टर, लॅपटॉप, साउंड सिस्टीम इत्यादी उपलब्ध करुन घेणे, प्रशिक्षणादरम्यान चहापानाची व्यवस्था करणे, उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी घेणे, अनुपस्थित कर्मचाऱ्यांना बजावण्याकरिता नोटीस तयार करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या व्हॉटसऍप ग्रृप तयार करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून तहलिसदार उल्हास देवरे तर सहायक कर्मचारी म्हणून गोकुळ पाटील, किशोर भांदुर्गे हे असतील.

टपाली मतपत्रिका व चिन्हांकित मतदार यादी :– टपाली मतपत्रिका वाटप, स्विकृती व इतर अनुषंगीक कार्यवाही करणे, टपाली मतपत्रिके संबंधित नोंदवह्या ठेवणे, चिन्हांकित मतदार याद्या तयार करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून तहसिलदार उल्हास देवरे तर सहायक कर्मचारी म्हणून हेमंत देवकर, जितेंद्र नांद्रे हे असतील.

वाहतूक व्यवस्था :– वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करणे, आवश्यक वाहने अधिग्रहीत करणे व त्या संबंधित इंधन इत्यादी अनुषंगीक कामे करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसिलदार प्रदीप पवार तर सहायक कर्मचारी म्हणून भक्तराज सोनवणे हे असतील.

मतदान केंद्र व्यवस्था:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रात सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, आयोगाच्या सूचनेनूसार प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीडीओग्राफी, वेब कास्टींग, सी.सी.टी.व्ही इत्यादी व्यवस्थेसाठी समन्वय अधिकारी म्हणून सर्व तहसिलदारांची तर सहायक म्हणून मुख्याधिकारी अमोल बागुल, दिनेश सिनारे, गटविकास अधिकारी सी.के.माळी हे असतील.

एस.व्ही.ई.ई पी (SVEEP) व मतदार मदत कक्ष :- मतदान प्रक्रिये संबंधी मतदारांच्या शंका, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे तस सहायक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी, उपशिक्षणाधिकारी निलेश पाटील हे असतील.

कर्मचारी व्यवस्थापन :- मतदान केंद्रस्तरीय पथके, सूक्ष्म निरीक्षक इत्यादी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणूकासाठी समन्वय अधिकारी म्हणून तहसिलदार उल्हास देवरे यांची तर सहायक कर्मचारी गोकुळ पाटील, किशोर भांदुर्गे हे असतील.

वेतनपट तयार करणे व वाटप करणे :- वेतनपट तयार करणे व वाटप करणेसाठी जितेंद्र चत्रे व तलाठी धिरज अहिरराव काम पाहतील.

प्रसार माध्यम व्यवस्थापन कक्ष :- माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, पेड न्यूज संबंधित कामकाज पाहणे, तसेच निवडणूक संबंधित माहितीचे प्रसारण, छायाचित्रण व प्रसिद्धी संबंधित कामकाज, प्रसार माध्यमांमध्ये व समाज माध्यमांमध्ये निवडणूकीसंबंधित वृत्तांकनाची माहिती कळविण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत तर सहायक संदीप गावीत असतील.

माहिती तंत्रज्ञान कक्ष :- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळांवर, मोबाईल ॲप, इतर संगणक प्रणालीवर विविध माहिती सादर करणे, अपलोड करणे, व अनुषंगी कामकाज पाहणेसाठी समन्वय अधिकारी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी तर सहायक जयेश खैरनार असतील. वरील सर्व नियुक्त समन्वय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार निवडणूक संबंधित कार्यवाही करावी असेही आदेशात नमूद केले आहे.

0 9 4 6 8 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *