हेल्मेट व सिटबेल्ट परिधान करणाऱ्या नागरिकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार

KHOZ MASTER
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार- : रस्त्यांवरील अपघाती मृत्यू हा बहुतांश हेल्मेट व सीटबेल्ट न वापरल्यामुळे होत असल्याने नागरिकांमध्ये हेल्मेट व सीटबेल्ट बद्दल जनजागृती करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत हेल्मेट व सिटबेल्ट परिधान करुन वाहन चालविणाऱ्या 50 वाहनचालकांना पुष्पगुच्छे देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हेल्मेट व सिटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांना रस्तासुरक्षा व वाहतुकीच्या नियमांचे समुपदेशन करण्यात येवून यापुढे वाहतूक नियम पाळण्याची प्रतिज्ञा ही यावेळी त्यांना देण्यात आली. सर्व नागरिकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करुन सुरक्षितरित्या प्रवास करावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *