जिजाऊ चरित्र ..

Khozmaster
1 Min Read

जिजाऊ चरित्र ..

 

कळण्यासाठीशिवबा

जाणा जिजाऊचरित्र

स्वराज्य जननी माता

सुयोग्य संस्कारी पुत्र

 

रयतेच्या कल्याणार्थ

दोन्ही तत्पर दिनरात्र

गाता ऐकता पोवाडा

ये शहारूनि गात्रगात्र

 

जमविले शूर मावळे

जिवाभावाचे ते मित्र

हतबल करे मोगलाई

पळे दुश्मन इतस्तत्र

 

जातिधर्म विविध पंथ

आणले सारे एक छत्र

आऊची शिकवण ती

महिला पुरुष एकसूत्र

 

असो ते कुराण पुराण

बा सगळे ग्रंथ पवित्र

हिंदुत्वशिकवे जिजाई

उघडा रे मनाचे नेत्र

 

धन्य धन्य ते प्रजाजन

लाभले जिजामा छत्र

राजमाता विद्यापीठी

आपण अजूनही छात्र

 

कळता जाणता आऊ

तया वंशज होऊ पात्र

नकोयं पुस्तकी प्रपंच

विचार आचरणी मात्र

 

– हेमंत मुसरीफ पुणे .

  9730306996.

  www.kavyakusum.com

 

0 9 4 2 4 3
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *