गळफास घेऊन इसमाची आत्महत्या पातूर येथील 22 एकर मधील घटना

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : शहरापासून निकट असलेल्या 22 एकर परिसरातील एका शेतातील धुऱ्यावर एक इसम झाडाला गळफास घेऊन लटकत असल्याचे आज स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.          दि. 10 जानेवारी 2023 ला अंदाजे 2 वाजताच्या दरम्यान 22 एकर परिसरातील शेख जावेद शेख सत्तार यांच्या शेतातील धुऱ्यावर निंबाच्या झाडाला एका इसमाने गळफास घेतल्याचे तेथील स्थानिकांच्या निदर्शनास आले असता घटनेची माहीती त्यांनी पातूर पोलिसांना दिली.सदर माहितीवरून पातूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक गजानन पोटे, निलेश ठाकूर यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून प्राथमिक तपास केला असता मृतकाचे नाव मो.वकील मो.वकील (वय 40) रा. समी प्लॉट,पातूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.      दरम्यान पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह शेतातून बाहेर आणून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलिस करीत आहेत.

0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *