प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :– तालुक्यातील स्वर्गीय रामरावजी गावंडे विद्यालय उमरा येथे दिनांक १०/०१/२०२३ रोजी ५० वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीचे परीक्षक एम. एस. गायकी, पी.पी. देशमुख, सय्यद शोएब यांनी मूल्यांकन केले सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पातुर येथील विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान प्रतिकृतीसह या प्रदर्शनी मध्ये सहभाग घेतला होता त्या सहभागी विद्यार्थ्यांमधून प्राथमिक गटातून कु. नैनसी प्रशांत म्हैसणे हिच्या ‘टायर किलर’ या प्रतिकृतीची तसेच माध्यमिक गटातून ओम विनोद कढोणे याच्या ‘कचरा व्यवस्थापन व रस्ता डागडुगी’ या प्रतिकृतीची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रदर्शनी स्थळी योगेश वाघमारे ठाणेदार पोलिस स्टेशन चांन्नी, तसेच सुनंदा जावरकर शिक्षण विस्तार अधिकारी, आरती धोटे साधन व्यक्ती प.स.पातूर, यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. निवड झालेले विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्ष्या सौ सपना म्हैसणे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन ढोणे सर तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कंकाळ सर तथा विज्ञान शिक्षक दिनेश करोडदे सर यांना देतात या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने तसेच मुख्याध्यापक सचिन ढोणे सर व मुख्याध्यापक कंकाळ सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
Users Today : 18