विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना केंद्र सरकार ने कापुस आयातीवरील शुल्क पुर्ण पणे माफ केले आसुन मध्यम धाग्याच्या म्हणजेच 28 mm लांबीचा धागा असणाऱ्या तीन लाख मेट्रिक टन कापसाची आयात आस्ट्रोलीया कडुन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आसुन तब्बल दोन ते अडीच हजार रूपये क्विंटलने कापसाचे भाव स्थानिक बाजारात पडले आहेत. गेल्या वर्षी बाजारात याच काळात बारा हजार रुपये क्विंटल विकला जाणारा कापुस आज आठ ते साडे आठ हजार रूपये क्विंटलने विकला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कापसाला मिळणारे भाव आणि होणारे उत्पादन पाहाता विदर्भ- मराठवाडय़ातील अनेक शेतकरी या वर्षी कापुस पीकाकडे वळले होते. पंरतु पुन्हा सरकारच्या निर्णयाने शेतकर्यांच्या पदरात निराशाच पडली आहे. महाराष्ट्रासह देशात मध्यम धाग्याच्या कापसाचे प्रचंड उत्पादन होत आसते आणि त्याला तुलनेने मागणी कमी आसुनही केंद्र सरकारने आयात विनाशुल्क करून तीन लाख मेट्रिक टन कापुस आयाताचे गौडबंगाल न समजन्या सारखे आसल्याचे मत विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केले. भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून कापुस आयातीचा निषेध करून सरकारने कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा आशा विनंतीचे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आल्याचे भूमिपुत्र कडुन कळविण्यात आले आहे.
Users Today : 33