मागील 27 वर्षापासून परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजू येथील विज्ञान शिक्षक विजय यशवंत पजई यांनी विज्ञान विषयाची कास धरून विद्यार्थ्यांसाठी स्वतःला झोकून दिले आहे विज्ञानाबरोबर इतर शैक्षणिक गोष्टींसाठी सुद्धा त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यांच्या अशा या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने त्यांना महाराष्ट्र शासनाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.शिक्षक पजई यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2021 22 करिता जाहीर झाल्याबद्दल बोरगाव मंजू येथील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल नुकतच जय बजरंग विद्यालय आळंदा येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या निमित्ताने जि. प. अध्यक्ष अकोला संगीताताई अढाऊ मॅडम, माजी आमदार प्रा. तुकारामजी बिरकड, शिक्षण सभापती मॅडम प्राचार्य शत्रुघ्नजी बिरकड, डॉ रवींद्र भास्कर सर व इतर मान्यवर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. बालवयापासूनच त्यांना विज्ञान विषयक गोष्टींची आवड होती निसर्गामधील घडणाऱ्या गोष्टींकडे त्यांनी नेहमीच डोळस दृष्टीने पाहून त्यामागील विज्ञान शोधण्याचा प्रयत्न केला आहे. व तीच बाब पुढे त्यांनी आपल्या शिक्षकी पेशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.वडील शेतकरी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी शिक्षणाप्रती असलेली आपली जिद्द कधीच सोडली नाही व तीच जिद्द त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य केले. परशुराम नाईक एका खेड्यामधील मोठी शाळा परंतु त्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन विविध विषयांवर आधारित विज्ञान प्रयोग सादर केले व त्याची निवड राष्ट्रीय पातळीवर होऊन शाळेचे प्रतिनिधित्व केले राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या प्रयोगाला भारताचे माजी राष्ट्रपती तथा महान शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या प्रोजेक्टचे अवलोकन केले तसेच त्यांचे कौतुक केले. पजई यांचे विद्यार्थी विज्ञान मेळावा असो इन्स्पायर अवार्ड असो अशा अनेक ठिकाणी त्यांचे विद्यार्थी चमकले आहेत. शिक्षक पजई यांनी ई साहित्य निर्मितीमध्ये दीक्षा ॲप करिता व्हिडिओ निर्मितीचे कार्य केले आहे स्पोकन इंग्लिश तथा ब्रिटिश कौन्सिल चे तज्ञ मार्गदर्शक आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यास गटाचे ते सदस्य आहेत तसेच कोरोना काळामध्ये त्यांनी सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे कार्य सुद्धा केले आहे.शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने ते शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन सुद्धा करतात. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक विद्यार्थी हे विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत .त्यांना यापूर्वी 2019 मध्ये आपल्या शिक्षण क्षेत्रातील समर्पित योगदानाबद्दल जि. प. अकोला कडून शिक्षक गुणगौरव पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे.शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये सुद्धा त्यांची अनेक वेळा राज्यस्तरावर निवड झालेली आहे. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर मॅडम यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले आहे. एका कर्तव्यनिष्ठ शिक्षकाला पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन तसेच कौतुक होत आहे.
Users Today : 18