डॉ श्यामकुमार सिरसाम यांच्यावर फौजदारी खटला दाखल करा – उमेश इंगळे

Khozmaster
1 Min Read

अकोला प्रती – सर्वोपचार रुग्णालयातील नेहमी वादात असलेले डॉ श्यामकुमार सिरसाम यांचा नविन प्रताप समोर आला आहे त्या बद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे सदर प्रकरण असे की महाराष्ट्र शासन या नावाची पाटी चार चाकी वाहनांसाठी असते तेपण फक्त शासकीय कर्मचारी वर्ग १ चे अधीकारी तरी पण सर्वोपचार वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर डॉ श्यामकुमार सिरसाम कार्यरत असुन त्यांच्या एम.एच.२७ ए.झेड.०१२१ या क्रमांकाच्या चार चाकी वाहनांवर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता महाराष्ट्र शासनाची पाटी लावून हे महाशय रोज महाविद्यालयात येत असतात या अश्या बेजबाबदार डॉ श्यामकुमार सिरसाम यांनी शासनाच्या आदेशासह नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या वर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे

0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *