सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबिर

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर तालुक्यातील भंडाराज बु येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबिर दत्तक ग्राम भंडाराज बु येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शैलेश दवणे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केतकी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे शिबिराचे उद्घाटन डॉ मंजुशा देशमुख विद्यार्थी कल्याण विभाग प दे कु वि अकोला यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश मुरमकार यांची शिबिराला उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शैलेश दवणे यांनी केले यांनी राष्ट्रीय कॅपचा अनुभवातून केला व मान्यवराच्या हस्ते संत गाडगेबाबा डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना जगदीश मुरंमकार यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जीवन विद्यार्थ्यांना कसे अनुभवता येते यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्राध्यापक शैलेश दवणे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केतकी देशमुख व आदिची सहकार्य लाभले.

0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *