दोनशे वर्षापूर्वी स्थापित असलेले वेताळबाबा संस्थान पौष महिन्यात दरवर्षी असते यात्रा उत्सव

Khozmaster
2 Min Read

मुर्तिजापुर – मुर्तिजापुर शहराच्या 5 किलोमीटर असलेले शेलु हे गांव वेताळ बाबाचे ग्रामदैवत असल्यामुळे शेलुवेताळ या नांवाने संपूर्ण विदर्भामध्ये प्रसिध्द आहे. पौष महिन्यामध्ये दर रविवारला याठिकाणी यात्रा भरते आणि उत्सव मोठया आनंदाने साजरा केला जातो. मागील 200 वर्षा पासून हा वारसा संस्थानासह ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण जोपासत असल्यामुळे विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून या पौष महिन्यातील उत्सवाला महत्व आहे. सन 1800 मध्ये शेलुवेताळ प्रतिष्ठित पाटील भगवान रामजी सरदार यांना स्वप्न पडले. पांढरे शुभ्र धोतर परिधान केलेला, डोक्याला लाल पागोटी, पाठीशी ढाल, कमरेला तलवार व हातामध्ये भाला असलेला भारदस्त व्यक्ती पांढऱ्या घोडयावर बसून आला आणि पाटलास म्हणाला की, आम्हाला तुमच्या गावामध्ये यायचे आहे. तुमच्या गावात एक वडाचे झाड असून ते सुकलेल्या अवस्थेत आहे. त्या सुकलेल्या झाडातून एक बाण निघालेला आहे. तो आमचाच चमत्कार आहे. तो पागांरा टिकावू नाही. म्हणून तुम्हाला सांगावयास आलो. तेव्ळा तुम्ही आमचा दिवस रविवारी त्या झाडाजवळ पुजा – अर्चनासह स्थापना करा. बाजूला विहिर खोदून घ्यावी. त्या विहिरीच्या पाण्याने भाविकांनी स्नान केल्याने लाभ होईल. त्याचप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात अली. अशी या वेताळबाबांची आख्यायिका आहे. तेव्हापासून या मंदिराकडे भाविकांचा ओघ असल्याचे दिसून येत आहे. काशी खंडात वेताळबाबांना शंकराचे दुत म्हटले आहे. शेलुवेताळ येथील स्मशानभुमी जवळ आख्यिका प्रमाणे मंदिराचा जिर्णोध्दार बाबांची कृपा झालेल्या भक्तांकडून करण्यात आला. मंदिराची भव्य वास्तु आहे. भुतबाधा झालेले, मानसिक रुग्ण व करणीबाधा असलेले रुग्ण येथे बाराही महिने उपचारा करिता येतात. असंख्य रुग्ण येथे बरे झाल्याचे वर्तविल्याचे जाते. त्यामुळे येथे पौष महिन्यात यात्रेमध्ये नवस फेडले जातात. पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी देवस्थानच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. या यावेळी दिनांक 15 जानेवारी 2023 रविवार ला महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष राजु वासूदेव सरदार उपाध्यक्ष अनिल विष्णुपंत सरदार सचिव विजय हिम्मतराव सरदार कोषाध्यक्ष प्रमोद किसनराव मोरे सदस्य ज्ञानेश्वर पंजाबराव सरदार व गांवकरी मंडळासह ग्रामस्थांनी केले आहे.

0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *