उद्योग सुलभतेसाठी कार्यशाळा संपन्न.

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा, दि. 13 : उद्योजकांसाठी उद्योग सुलभता आणि व्यवसाय वाढीसाठी उद्योग विभाग, मैत्री विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी, दि. 11 जानेवारी 2023 रोजी कार्यशाळा पार पडली.कार्यशाळेला जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, उद्योग उपसंचालक श्री. भुरेवाल, नाबार्डचे व्यवस्थापक श्री. पठारे, अग्रणी बँक अधिकारी नरेश हेडावू आदी कार्यशाळेस उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी उद्योजकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे यावे, तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यासाठी कोणतीही समस्या असल्यास सोडविण्याचे आश्वासन दिले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023च्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व लक्षात घेता सर्व उद्योजक अधिकारी, कर्मचारी यांनी पौष्टिक तृणधान्याचे विविध पाककृती नागली बिस्कीट,बाजरीचे अप्पे व शिरा, ज्वारीचे धिरडे, मिक्स तृणधान्य लाडूचे महत्त्व सांगितले. दररोज कडधान्यापासून तयार होणाऱ्या पौष्टीक आहाराचा समावेश करावा, असे आवाहन केले. मुंबई येथील मैत्री सल्लागार सरीम खान आणि अमेशा शेट्टी यांनी ईज ऑफ डुईंग बिजनेस सुधारणांबाबत सादरीकरण केले. त्यांनी उद्योजकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी शासन राबवित असलेल्या आणि नव्याने येवू घातलेल्या धोरणावर चर्चा केली.जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी प्रास्ताविकात व्यवसायिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, तसेच आयटी पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध सुधारणाविषयी माहिती दिली. उपस्थितांचे एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या पिकाचे बियाणे देवून स्वागत करण्यात आले. व्यवस्थापक एन. एस. पाटील यांनी आभार मानले.

0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *