मुर्तीजापुर राष्ट्रीय महामार्गावर मुर्तीजापुर तालुक्यातील खरब नवले ते हेंडच्या दरम्यान रोडच्या बाजूला आज दिनांक 13 रोजी सकाळी एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे या व्यक्तीची ओळख अपघात पटली नसून मुर्तीजापुर ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाची श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात रवानगी केली आहे रात्रीच्या वेळी महामार्ग असल्याने रोडवर मोठ्या प्रमाणावर दळणवळण असते आज सकाळी या ठिकाणी अंदाजे 35 ते 40 वर्षीय तरुणाचा मृतदेह अत्यवस्थ अवस्थेत अमित रमेश तिवारी वय 42 राहणार खराब नवले ग्रामस्थ शेतात पाणी देण्यासाठी आले असता आढळून आला घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिल्या गेली घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव पो हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके पो हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गजानन आपत्कालीन पथकाचे सेनापती शेवतकर बादशाह यांना पाचारण करून तरुणास रुग्णालयात हलवलं मृत्यूचे कारण समजू शकले नसून त्याची ओळख ही पटलेली नाही पुस्तकाची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या अंगावर तपकिरी गुलाबी पांढऱ्या रंगाची टी-शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेली असून त्याच्या गळ्यात तुळशीची माळ व काळ्या धाग्यात देवीचे लॉकेट सह 25 पैसे व दोन रुपये आहे डाव्या पायात हिरव्या धाग्यात कवळी बांधलेली असून हातावर चेतराम आई असे बोललेले आहे ओळख पटवण्यासाठी मृतदेहाला रुग्णालया शीतगृहात ठेवण्यात आलेले आहे असे ग्रामीण पोलिसांनी सांगितले सदर घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके व पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन थाटे करीत आहे
Users Today : 18