अत्याचार आणि पास्कोच्या गुन्ह्यातून युवा बिल्डरची निर्दोष मुक्तता

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधि अशोक भाकरे अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल अकोला : तुला खाऊ देतो म्हणून अल्पवयीन पाल्याचा विनयभंग करुन तीच्यावर अत्याचार केल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात बालिकेच्या आईने केली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सदर खटल्यात गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्हे दाखल असलेल्या युवा बिल्डरची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. कौलखेड परिसरात राहणार्‍या बांधकाम व्यवसायी सागर कैलास प्रांजळे या 23 वर्षीय युवा बिल्डरने एका अज्ञान बालिकेला खाऊ देतो म्हणून जवळ घेवून तीचा विनयभंग केल्याची तक्रार खदान पोलिस स्टेशनला देण्यात आली होती. या गंभीर तक्रारीवरुन युवा बिल्डरविरुद्ध कलम 354, 354 अ, 354 ब, 376 (अब)व पोक्सो कलम 4,6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात झालेल्या सुनावनीमधे सरकारी पक्षाने एकूण 8 साक्षी पुरावे सादर केले होते. आरोपी पक्षाच्या वकिलांनी साक्षी पुराव्यांची उलट तपासणी घेऊन तसेच खटल्यामागिल सत्य न्यायालयापुढे सादर करित जुन्या वैमनस्यातुन सदर खोटी तक्रार लहान मुलीचा आधार घेऊन फिर्यादींनी केली असल्याचे सिद्ध केले.अखेर या प्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा पास्को विषेश न्यायाधिश एस.जे. शर्मा यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन गुन्ह्यांतून आरोपीची निर्दोष मक्तता केली. या खटल्यात आरोपीच्या वतीने अँड. सुमित महेश बजाज, अँड. रफिक ख्वाजावाले, अॅड.अमोल भोसले, अँड.भाग्यश्री किटे यांनी काम पाहिले. या गुन्ह्यात युवा बिल्डरला खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्याने फिर्यादीने स्वतः च्या लहान बालिकेचा आधार घेत आमच्या पक्षकार युवा उद्योजकाला अडकविण्यासाठी खोट्या गुन्ह्यात गोवले. आज न्यायालयाने मात्र सर्व प्रकरणाची हकीकत जाणून घेत पक्षकाराला न्याय दिला व लागलेल्या सर्व आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली

 

0 9 4 7 2 9
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *