निवडणूक खर्च तात्काळ सादर करण्याचे आवाहन

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा, दि. १३ : जिल्ह्यात सन २०२२ मध्ये तीन टप्यात निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करून निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च तात्काळ सादर करावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या वर्षभरात जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळामध्ये तीन टप्यात जिल्ह्यातील १३ तालुक्यातील २९२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत प्रत्यक्ष उभे असलेल्या उमेदवारांना एका महिन्याच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळात सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणूक लढविली आहे त्या उमेदवारांनी निवडणूक खर्च तात्काळ सादर करावा. विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्यास संबंधितावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत कळविले आहे.

0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *