30 जानेवारी 2023 पर्यंत मुदत बुलडाणा, दि. १३ : राज्य शासनातर्फे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षासाठी स्वतंत्र रित्या देण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी 30 जानेवारी 2023 मुदत देण्यात आली आहे. इच्छुकांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) पुरस्कार देण्यात येतात.शासनाने नुकतीच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. यानुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षांच्या स्वतंत्र पुरस्कारासाठी राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे सादर करावेत.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची मुदत दि.16 ते 30 जानेवारी, 2023 आहे. पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 37