नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर गणपती मंदिर व जैन मंदिर चोरीच्या गुन्ह्यातील 02 आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद : 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी…

Khozmaster
7 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: येथील ग्रामदैवत श्री. दंडपाणेश्वर गणपती मंदिरातील दागिने चोरीचा गुन्हा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडून उघड झाला आहे.  नंदुरबार येथील जैन मंदिर व श्री. दंडपाणेश्वर गणपती मंदिराली दागिने चोरणाऱ्या आरोपींना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.  चोरीला गेलेल्या 01 किलो 210 ग्रॅम चांदीही पोलिसांनी हस्तगत केली आहे.याप्रकरणी कितरलिया शिवराम ब्राह्मणे ( तडवी )(35), जतन रूमसिंग मोरे (25) दोघे राहणार – मोहाला ता. सेंधवा जि. बडवानी मध्य प्रदेश.     या दोघा आंतरराज्यीय आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात नंदुरबार येथील दंडपानेश्वर गणपती मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी देवाची दागिने चोरून नेले,   याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 08 ते 09 जानेवारी 2023 रोजी रात्री 11.00 ते सकाळी 04.41 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर गणपती मंदिराच्या गाभाऱ्याचे मुख्य दरवाज्याचे कुलूपाचा कडी कोयंडा तोडून गणपतीचे अंगा वरील एक ते सव्वा किलो चांदीच्या दागिण्यांचे आभुषणे व दानपेटी मधील 12 हजार रुपये रोख रुपये तसेच पुखराज मोडमल जैन यांचे फार्म हाऊस मध्ये असलेल्या जैन मंदिरामधील दान पेटी फोडून अंदाजे 10हजार रुपये रोख असा एकुण 52,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. त्याबाबत चंद्रकांत प्रल्हाद चौधरी ( 50) रा. जळका बाजार पोस्ट ऑफिस जवळ, नंदुरबार यांनी दिलेल्या तक्रारी वरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 09/2023 भा.द.वि. कलम 457,380 प्रमाणे दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी दाखल आहे.   सदरची घटना ही नागरिकांच्या धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हयांतील आरोपीतांना तात्काळ अटक करुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करुन व आरोपीतांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. चोरट्यांनी दंडपाणेश्वर गणपती मंदिरामधील सी.सी.टी.व्ही. चा DVR देखील चोरुन नेला म्हणून चोरट्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याचे व गुन्ह्यातील श्री. गणपतीचे चांदीचे आभुषणे हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी.सी.टी.व्ही. तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, परंतु CCTV फुटेज अस्पष्ट असल्यामुळे आरोपीतांची निश्चित ओळख होत नव्हती.  नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त माहीती मिळाली की, नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर श्री. गणपती मंदिरातील चोरी मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील रेकॉर्ड वरील आरोपी किरतलीया शिवराम ब्राम्हणे रा. मोहाला ता. सेंधवा जि. बडवाणी याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने मिळून केली असून गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्याकरीता जळगाव येथील सराफ बाजारात जाणार आहे. तसेच दोन्ही आरोपीतांवर यापुर्वी देखील मालमत्तेविरुध्द गुन्हे दाखल आहेत.  सदरची माहीती नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून संशयीत किरतलीया ब्राम्हणे याला ताब्यात घेवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा येथे रवाना केले. तपास पथकाने मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील मोहाला गाठून दोन्ही आरोपीतांचा शोध घेतला असता, दोन्ही आरोपी हे सराईत व अत्यंत चालाख असल्यामुळे ते सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत असतात. तसेच मोहाला हे गाव डोंगराळ भागात असून तेथे विरळ वस्ती आहे, त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींचा नेमका ठाव-ठिकाणा समजून येत नव्हता, परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनोळखी अशा मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा येथे देखील कमी वेळेत बातमीदारांचे जाळे तयार केले. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपी हे मंदिरा मधील चोरी करुन आणलेले चांदीचे दागिने जळगांव येथे विक्री करण्यासाठी जाणार असले बाबत माहिती काढण्यात यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ जळगांव शहर गाठून जळगांव शहरातील सराफ बाजार व आजू-बाजूला वेषांतर करुन सापळा रचला, परंतु सराफ बाजारामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे दोन्ही आरोपीतांना शोधण्यात अडचणी येत होत्या. त्याच दरम्यान दोन संशयीत इसम MP-46 क्रमांकाच्या मोटार सायकलसह एका नाश्ता सेंटर येथे उभे असलेले दिसले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत सावधगीरीने दोन्ही आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेतले.

दोन्ही संशयीत.

किरतलीया शिवराम ब्राम्हणे (तडवी) (35)

जतन रुमसिंग मोरे (25 )

दोन्ही राहणार- मोहाला ता. सेंधवा जि. बडवानी (म.प्र राज्य)

दोन्ही संशयीतांना नंदुरबार येथील मंदिरात झालेली चोरी व मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी दोघांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले व गुन्हा करतांना मंदिरा मधील चांदीचे दागिने त्यांच्या मोटार सायकलच्या हँडलला लावलेली कापडी पिशवी असलेल्या बॅगेत असल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या कापडी पिशवी मधून 66,550/- रुपये किमतीचे 1 किलो 210 ग्रॅम वजनाचे गणपतीच्या अंगावरील चांदीचे दागिने, 17,260/- रुपये रोख व 60 हजार रुपये किमतीची एक लाल काळया रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल क्रमांक MP.46 MW. 0533 असा एकूण 1,44,170 रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने ते गुन्ह्यात कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केले आहे.

वरील दोन्ही संशयीत आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून त्यांना अधिक विश्वासात घेवून सखोल विचारपूस करता त्यांनी मागील एक ते दिड वर्षापूर्वी नंदुरबार शहराच्या अलीकडे असलेल्या 10 ते 12 कि.मी. असलेल्या एका गावातील घराचे कुलुप कडी कापून घरात प्रवेश करुन एका लोखंडी पेटीतील रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने चोरुन नेले होते. त्याबाबत नंदुरबार शहर, तालुका, उपनगर येथील गुन्हे अभिलेख पडताळणी करुन पाहिले असता नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 545/2021 भा.दं.वि. कलम 457,380 प्रमाणे दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही संशयीत आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिरातील चोरी सारखा अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा अल्पापवधीतच उघडकीस आणून गणपतीच्या अंगावरील चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे. याबाबत सर्व नागरिकांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी हा गंभीर गुन्हा उघडकीस आणणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास 10,000/- रुपये रोख बक्षिस जाहीर केले.    ही कामगिरी कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी, सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, मुकेश तावडे, राकेश मोरे, विकास कापूरे, मोहन ढमढेरे पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपूत, किरण मोरे यांच्या पथकाने केली आहे.

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *