शास्त्रीय सण ..
धर्म मंदिरा बांधले
नव शास्त्राचे तोरण
संक्रांत सणा दडले
असे शास्त्रीयकारण
मना मनात शिरावे
सार्थ ज्ञानाचे किरण
अंतर्बाह्य हो बदल
करी सूर्य उत्तरायण
तीळ बाजरीभाकरी
उष्ण पदार्थांचे गुण
गारठ्याशी लढायला
भलीउर्जा मिळे पण
गुळ हरबरा पावटा
देता एकमेकां वाण
दातृत्व होई जागृत
येई माणूसकी जाण
पतंगउत्सव साजरा
संघ भावनेची खूण
विसरला जाती भेद
केवढे सणाचे ऋण
भिष्माचार्याने घेतले
अंती स्वेच्छेने मरण
सांगे संपवा भांडण
नको युध्दाचे ते रण
बळीराजासुखावला
करी शिवार औक्षण
सकलांच्या अंतरात
यावे आनंदाचे क्षण
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com
Users Today : 0